आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता १५ हजार व्‍यापा-यांची खाती गोठवण्याचा पवित्रा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- एलबीटी अर्थात स्थानिक स्वराज्य संस्था कराची विवरणपत्रे सादर न करणाऱ्या शहरातील १४ हजार ८१३ व्यापाऱ्यांची बँक खातीच गोठवण्याची प्रक्रिया महापालिका करणार असून, तत्पूर्वी पाच हजार रुपये दंड भरण्याची नोटीस बजावली जाणार आहे. नोटीसला उत्तर न दिल्यास पुढील कारवाई होणार आहे.
महापालिका क्षेत्रात ३० हजार ८१८ व्यापाऱ्यांनी एलबीटीची नोंद केली आहे. त्यामुळे विवरणपत्राद्वारे या व्यापाऱ्यांनी किती एलबीटी भरला व किती माल भरला याची पडताळणी करणे महापालिका प्रशासनाला सोपे जाणार आहे. आतापर्यंत ११ हजार ५५८ व्यापाऱ्यांनी विवरणपत्रे भरली आहेत. १९ हजार ३८० व्यापाऱ्यांनी विवरणपत्रे सादर केलेली नाहीत. त्यापैकी १४ हजार व्यापाऱ्यांना पालिकेने नोटीस बजावल्या आहेत. या नोटिसांना उत्तर मिळत नसून, आता पहिल्या टप्प्यात पाच हजार दंडाची नोटीस बजावली जाणार आहे. त्यास उत्तर न िमळाल्यास संबधितांची बँक खाती गोठवण्याचे पाऊल प्रशासन उचलणार असल्याचे कर विभागाकडून सांगण्यात आले.
सुप्रिया सुळे यांचे पत्र वादात
ह्यआमचे सरकार आले तर एलबीटी रद्द करू,ह्ण अशा आशयाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्हॉट‌्सअ‍ॅपवर आलेले पत्रही चर्चेचा विषय ठरले आहे. मुळात, ह्यआता सरकार कोणाचेह्ण, असा प्रश्न व्यापारी विचारत असून, विशेष म्हणजे, सद्यस्थितीत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडेच तो अधिकार आहे. त्यामुळे हातात वेळ असताना एलबीटी का रद्द केला नाही वा निवडणुकीच्या तोंडावर निर्णय होतो, की एलबीटी परिषदेचा धसका सत्ताधारी
काँग्रेस आघाडीने घेतलाय अशी कुजबूज व्यापारी वर्गात रंगत आहे.