आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Labour Facility Portal For Industries, One Step Towards Make In Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्योगांसाठी लवकरच श्रम सुविधा पोर्टल,‘मेक इन महाराष्ट्र’च्या दिशेने पुढचे पाऊल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - श्रमसुविधा पोर्टल आणि लेबर इन्स्पेक्शन योजना राज्यात लागू करण्यात येणार असून, त्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा दिल्लीत प्रारंभ झाला. राज्य शासनानेही राज्यातील उद्योगजकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
या श्रम सुविधा पोर्टलद्वारे उद्योगगांना कामगार कायद्याचे पालन करणे सोयीचे होणार असून, त्यासाठी ऑनलाइन रिटर्न भरण्याची सुविधा या पोर्टलवर देण्यात आल्याने पेपरलेस कामकाज होणार असून, उद्योगाच्या वेळ श्रमाची यामुळे बचत होणार आहे.

या पोर्टलद्वारे आस्थापनांना युनिक लेबर आयडेंटिफिकेशन नंबर देण्यात येणार आहे. निरीक्षण योजना पारदर्शक करण्यात येऊन याद्वारे अंमलबजावणी करणा-या यंत्रणेच्या स्वैर कारभारावरही या यंत्रणेमुळे आपोआपच नियंत्रण येणार आहे. श्रम सुविधा पोर्टलची ही यंत्रणा जबाबदार होण्याच्या दृष्टीने राज्य सरकारतर्फे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार आहेत. उद्योगांचा निरीक्षण अहवालही ७२ तासांत पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक केले आहे. या पोर्टलद्वारे राज्यात उद्योग सुरू करण्यासाठी मदतही देण्यात येणार आहे. वेळच्या वेळी तक्रारींचे निवारणही केले जाणार असल्याने ‘मेक इन महाराष्ट्र’च्या दिशेने हे आणखी एक प्रभावी पाऊल राज्य सरकारने उचलले आहे. पोर्टल लेबर इन्स्पेक्शन स्किमशी संलग्न होण्यासाठी या विभागाची सद्यस्थिती विभागांतर्गत करावयाची कार्यवाही याचा अभ्यास करण्यासाठी विशेष समितीची स्थापना राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा कामगार विभागाने केली आहे. या समितीकडून विविध बाबींचा अभ्यास केला जाणार आहे.

शासकीय समिती करणार याचा अभ्यास
माहितीसंगणकीकरण, राज्य निरीक्षण योजना अधिसूचीत करणे, ऑनलाइन वार्षिक विवरणपत्रे एक खिडकीद्वारे भरण्यासाठी नियम सुधारणे, निरीक्षण अहवाल सुलभीकरणासाठी नियम सुधारणे, निरीक्षणासाठी निवडीचे निकष तयार करणे, सेंट्रल अॅनालिसिस अॅण्ड इंटेलिजन्स युनिट स्थापने, अंमलबजावणीसंदर्भात तक्रार निवारण यंत्रणा अधिसूचीत करून निरीक्षण योजनेशी संलग्न करणे.