आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारविरुद्ध असलेली खदखद निवडणुकीतून दिसेल : कदम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्यकेंद्र शासनाविराेधात प्रत्येक समाजाच्या मनात खदखद असून, हा संताप अाता निवडणुकांमधून नागरिकच व्यक्त करणार अाहेत. केवळ नागरिकांचे अधिकाधिक मतदान करुन घेण्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कार्यप्रवण करण्यासाठी प्राेत्साहित करत असल्याचे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष डाॅ. विश्वजीत कदम यांनी सांगितले.

युवक काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीच्या निमित्ताने नाशकात अाले असताना पत्रकारांशी ते बाेलत हाेते. या वेळी त्यांनी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी सर्व यंत्रणा झटून कामाला लागली असून त्याबाबत अाज पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात अाल्याचेही त्यांनी नमूद केले. युवक काँग्रेसच्या वतीने उच्चांकी मतदान नाेंदणी करण्याचे ध्येय अाम्ही ठेवले असल्याचेही नमूद केले. राष्ट्रवादी काँॅग्रेसने त्यांचा उमेदवार देणे हा त्यांचा निर्णय असून अाम्ही डाॅ. तांबे यांच्या विजयासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका निवडणुकांसाठी युवक काँग्रेसच्या अधिकाधिक पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देण्याचा प्रयास केला जाणार अाहे. मात्र त्यासाठी प्रमाणाची टक्केवारी नसून निवडून येण्याचे मेरिट हाच उमेदवारीचा निकष ठेवला जाणार असल्याचेही कदम यांनी नमूद केले. यावेळी उपाध्यक्ष सत्यजीत तांबे , काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अाहेर, डाॅ. शाेभा बच्छाव, डाॅ. हेमलता पाटील, ऋतिक जाेशी, राहुल दिवे, ज्ञानेश्वर गायकवाड अादी उपस्थित हाेते.

बैठकीत प्रचाराचा मंत्र
पत्रकारपरिषदेपूर्वीझालेल्या युवक कांॅग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीत बाेलताना कदम यांनी कार्यकर्त्यांना सामान्य माणसांची कामे करा, त्यांच्या सुखदुखात सहभागी व्हा अाणि साेशल मिडीयाचा प्रभावी वापर करा असा मंत्र यावेळी दिला. तर उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी प्रत्येकाने अापल्या भविष्यातील राजकारणाचा विचार करून कार्यप्रवण हाेण्याची अावश्यकता असल्याचे सांगितले. नाशिक पदवीधर हा भाजपाचा नव्हे तर काँग्रेसचा बालेकिल्ला असून ताे तसाच अभेद्य राखण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकी किमान ४० कार्यकर्त्यांना कामाला लावून मतदारनाेंदणी करून घेण्याचा कानमंत्रदेखील दिला.

निकालात फरक नाही
विधानपरिषदनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिल्याने किंवा अन्य काेणत्याही पक्षाचा कुणीही उमेदवार असला तरी निकालात फरक पडणार नाही. नवीन मतदार नाेंदणी करायला लावली असली तरी त्यानेदेखील फारसा फरक पडणार नसल्याचे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सांगितले. नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते अधिकाधिक सक्रिय झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले. यामुळे पहिल्यापेक्षा जास्त नोंदणी होईल असा विश्वास व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...