आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला वाहकाचा विनयभंग;एसटीच्या निरीक्षकास अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राज्य परिवहन महामंडळाच्या मेळा बसस्थानकावरील वाहतूक निरीक्षक विजय निकम यास महिला वाहकाचा हात पकडून विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. संशयित निकम याने मोबाइलवर अश्लील एसएमएस करण्याबरोबरच शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. दरम्यान, या गंभीर प्रकारावर एसटी महामंडळ काय कारवाई करणार, याकडे कर्मचार्‍यांचे लक्ष लागले आहे.

सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, संशयित वाहतूक निरीक्षक विजय निकम (रा. रायगड बिल्डिंग, मेळा बसस्थानक आवार) यांने अधिकारपदाचा गैरवापर करून महिला वाहक असलेल्या तरुणीला वारंवार मोबाइलवर एसएमएस करून भेटण्यासाठी बोलवित असे. शनिवारी सायंकाळी पुन्हा महिला वाहकास कामाच्या नावाने बेालावून घेत घरी कोणीच नसल्याचे सांगून तिला घरी येण्याचा आग्रह धरला. तिने नकार देताच तिला जबरदस्तीने ओढण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी निकम यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक राजगुरू करीत आहेत. या प्रकाराबाबत एसटीच्या महिला वाहकांमध्ये असुरक्षिततेची आणि संतापाची भावना निर्माण झाली असून, निकम यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.