आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशातील लाखोंचे पॅकेज सोडून नाशिकच्या तरुणाचे ‘स्टार्ट अप’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यांच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्टार्ट अप’ या योजनांनी प्रभावित होऊन नाशिकच्या तरुणाने स्किल इंडियाला चालना देण्यासाठी ‘स्टार्ट अप’ केला आहे. कार निर्मितीतील आघाडीची कंपनी असलेल्या मर्सिडिज बेंझमधील 'आर अॅण्ड डी’मध्ये टीम लीडर म्हणून परदेशातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून नाशिकच्या तरुणाने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना डिझाइन अॅण्ड इनोव्हेशनचे धडे देण्यासाठी स्वत:ची कंपनी सुरू केली आहे.नाशिकच्या मराठा हायस्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर युवराज वडजे याने पुणे विद्यापीठाकडून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली.
डिप्लोमा इन बिझीनेस मॅनेजमेंट करून युवराजने सुरुवातीला ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ या कंपनीत पाच वर्षे नोकरी केली. त्यानंतर टाटा मोटर्समध्ये काही वर्ष नोकरी केली. कार डिझाइनमधील अनुभवाच्या जोरावर मर्सिडीज बेंझ या कंपनीत चीनमध्ये नोकरी लागली. चीनमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत असताना युवराजला चांगल्या पॅकेजची ऑफर होती. जर्मनी, कोरिया या देशांमध्येही त्यांनी इनोव्हेशननचे काम केले. भारत अमेरिकेतही त्यांचे पेटंट रजिस्टर अाहेत. परंतु, आपल्या ज्ञानाचा उपयोग हा विद्यार्थ्यांना व्हावा, या उद्देशाने युवराजने नोकरी सोडून नाशकातच स्वत:ची ‘यूव्ही नॉलेज लिंक’ नावाची कंपनी सुरू केली. त्याद्वारे मेकॅनिकल, ऑटोमोबाइल, इंजिनिअरिंगमधील विद्यार्थ्यांना डिझाइन इनोव्हेशनचे प्रशिक्षण तसेच प्लेसमेंटसह लघु उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.
कौशल्य विकासाची गरज
इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना कौशल्याअभावी रोजगाराच्या संधीपासून वंचित राहावे लागते. देशातील ७० टक्के इंजिनिअर्संना उद्योग क्षेत्राला अपेक्षित कौशल्याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. उद्योजक घडविण्यासाठीही योग्य मार्गदर्शन हवे आहे. शिक्षण आणि उद्योग यातील दरी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. - युवराज वडजे, यूव्ही नॉलेज लिंक
बातम्या आणखी आहेत...