आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लासलगावी होळकर विरुद्ध होळकर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासलगाव - राष्ट्रवादीकडून जयदत्त होळकर व कॉँग्रेसकडून गुणवंत होळकर हे इच्छुक आहेत. दोघेही सख्खे चुलत भाऊ आहेत. दोघांनाही भुजबळांचे नेतृत्व आहे. त्यामुळे खरोखर दोघांत ही लढत होणार की, दोनही कॉँग्रेसमध्ये आघाडी झाल्यास या दोघांपैकी एकालाच लढता येईल मात्र, मनसेकडून जर रवी होळकर यांना उमेदवारी मिळाली तरी होळकर विरुध्द होळकर ही लढत पहायला मिळणार का याची सध्या चर्चा सुरू आहे. तसेच सध्या चंद्रशेखर होळकर यांचीही तयारी सुरू आहे. ते कोणत्या पक्षाकडून लढणार मात्र, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे निवडणुकीचा आखाडा तापल्यावर खरी मजा येणार आहे.
लाल दिवा मिळणार का? - जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीकरता राखीव असल्याने व लासलगाव गटाचे आरक्षणही तेच असल्याने या लासलगावला लाल दिव्याचा मान मिळणार का अशी चर्चा असून, मागील पंचवार्षिक निवडणुकीत पाचही वर्ष अध्यक्षपद येवल्याकडे होते. लासलगाव येवला मतदार संघात येत असले तरी तालुका निफाड आहे. त्यामुळे निफाड तालुक्यात येणा-या लासलगावला लाल दिवा मिळणार का याचीही चर्चा रंगत आहे.
अण्णांच्या जादूचे काय? - जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार विरोधात आंदोलन केले खरे, पण नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत कॉँग्रेसला व राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळाले त्यामुळे आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अण्णांची जादू चालणार का हा खरा प्रश्न आहे.
कार्यकर्त्यांना सोनियाचे दिन.. - निवडणुकीचे वातावरण तापू लागले की कार्यकर्त्यांना चांगलेच डिमांड असते. आरक्षणामुळे काहीसे नाराज झालेले कार्यकर्ते गणातील सर्वसाधारण जागेमुळे कमालीचे खुश झाले असून, येत्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना सोनियाचे दिन येणार असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.
मतांची विभागणी - लासलगाव गणाकरिता राष्ट्रवादी, शिवसेना, कॉँग्रेस, मनसे या प्रमुख पक्षांच्या इच्छुकांची संख्या मोठी असल्याने लासलगावी मतांची मोठी विभागणी होणार आहे. कारण लासलगाव येथून उमेदवार देण्यावर सर्वच पक्षांचा भर राहणार आहे. त्यातच आरक्षण असल्याचा त्याचाही मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.सर्वच पक्ष स्थानिक उमेदवार देणार आहेत.