आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बालिका शोषण प्रकरणी लालचंद पिपाडा अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पेठरोडवरील तवली फाटा येथील जय आनंद अनाथ बालकाश्रमाचे मुख्य विश्वस्त लालचंद पिपाडा यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी आरोपींची संख्या आता पाच झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

आर्शमातील पाच जणांकडून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी दिलीप हिवराळे यांच्या तक्रारीवरून आश्रमातील भाऊसाहेब थोरात, संतोष थोरात, जगन्नाथ भालेराव, हरेश पाटील या चार जणांना अटक करण्यात आली होती.

पोलिसांना चौकशीत आश्रमाचे मुख्य विश्वस्त लालचंद पिपाडा यांच्याबद्दल काही संदिग्ध माहिती समोर आल्याने पंचवटी पोलिसांनी त्यांना शुक्रवारी दुपारी ताब्यात घेत चौकशी केली. त्यात आणखी त्यांच्याबद्दल आणखी धक्कदायक माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना त्वरित अटक केली. दरम्यान, याबाबत पोलिसांनी खुलासा केला नसला तरी पिपाडा यांचे राजकीय नेत्यांशी घनिष्ठ संब्ांध लक्षात घेता त्यांच्यावर कारवाई होत नसल्याची चर्चा आहे.