आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभासाठी भूमीअधिग्रहणाची घाेषणा: ध्वजस्तंभावर हेलीकाॅप्टरने पुष्पवृष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कुंभमेळा ही शतकानुशतकांची परंपरा असल्याने त्यासाठी नाशकात दर बारा वर्षांनी कायमस्वरुपी जागा लागते. त्या जागेसाठी मग काेर्टापर्यंत जाण्याची वेळ अापल्यावर येते. त्यामुळे भविष्यातले कुंभ निर्विघ्नपणे पार पडावेत, यासाठी साधुग्रामच्या जागेचे कायमस्वरुपी अधिग्रहण करण्याचा निर्णय अाम्ही घेतला असल्याची घाेषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. केंद्रीय अायुष मंत्री श्रीपाद नाईक अाणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत रामकुंडावरील ध्वजस्तंभावर हेलीकाॅप्टरद्वारे झालेल्या पुष्पवृष्टीमुळे ध्वजाराेहणाचा साेहळा नाशिककरांसाठी अविस्मरणीय ठरला.
विद्युत राेषणाईने झगमगणाऱ्या अाणि फुलांच्या माळांनी सजलेल्या रामकुंडावर जगदगुरु शंकराचार्य नरेंद्राचार्य महाराज, जगदगुरु शंकराचार्य हंसदेवाचार्य महाराज, अाखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत ग्यानदास महाराज, वलजलभाचार्य महाराज, श्री महंत कृष्णदास महाराज, श्री महंत धरमदास महाराज, श्री महंत राजेंद्रदास महाराज, खासदार हेमंत गाेडसे, अामदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापाैर अशाेक मुर्तडक, उपमहापाैर
गुरुमितसिंग बग्गा, गुरुमाऊली अण्णासाहेब माेरे तसेच तिन्ही अनी अाखाड्यांचे महंत अाणि हजाराे नाशिककरांच्या उपस्थितीत हा दिमाखदार साेहळा पार पडला.
ध्वजाराेहणाने कुंभमेळ्याचा शंखनाद झाल्यानंतरच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या जागा अधिग्रहणाच्या घाेषणेचे उपस्थित हजाराे नाशिककरांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. यावेळी बाेलताना मुख्यंमत्र्यांनी सांगितले की, चार ठिकाणी हाेणाऱ्या कुंभांतील नाशकात भरणारा कुंभ अत्यंत कठीण मानला जाताे. अन्य तिन्ही ठिकाणच्या कुंभांमध्ये साधुग्राम वसवण्यासाठी त्यांना ३ ते ४ हजार एकराची जागा उपलब्ध असते. त्याउलट नाशकातील कुंभ केवळ ३२५ एकराच्या जागेत अाणि त्यातही पावसाळ्यात भरणारा असल्याने येथील कुंभाचे अायाेजन बिकट असूनही कुंभमंत्री गिरीश महाजन यांच्यासह सर्व संबंधितांनी ही जबाबदारी अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न केला अाहे. यंदाच्या कुंभात गर्दी टाळण्यासाठी ३५०० मीटरचे घाट बांधण्यात अाले असून सर्व शाहीस्नान साेहळे निर्विघ्नपणे पार पडतील, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. यंदाचा कुंभ हा निसर्गाला समर्पित असलेला हरीतकुंभ करायचा अाहे. सर्व नाशिककरांना मिळूनच हा हरीतकुंभ यशस्वी करण्याची जबाबदारी उचलायची असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कुंभमेळ्यामुळे समाजजीवन समृद्ध : श्रीपाद नाईक
याप्रसंगी केंद्रीय अायूष मंत्री
नाईक म्हणाले की, गाेदाकाठी भरणाऱ्या कुंभमेळ्यात स्नानाने तन-मन स्वच्छ हाेते. अापल्यातील वाईटाची भावना नाहीशी हेाऊन येथूनच चांगल्या कामाला सुरूवात केली पाहिजे. देशाला अध्यात्मिक ताकद कुंभाने प्राप्त हाेते. संपुर्ण विश्वात सुख, शांती नांदावी, यासाठी साधू महंतानी कुंभमेळ्याची परंपरा पुढे नेली अाहे. समाजजवीन व राष्ट्रजीवन समृद्ध हाेण्यासाठी कुंभमेळा उपयुक्त ठरणार असून साधूमहंतांच्या साेयी, सुविधेसाठी केंद्र सरकारकडून सर्वाेताेपरी प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
साेवळ्यातले महाजन
झाले महाराज

अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी बाेलताना पालकमंत्री महाजनांना अाता गिरीश महाराज म्हणूनच सारे अाेळखू लागल्याचे सांगितले. त्याअाधी गिरीश महाजन यांनी मला सुधीरभाऊंनी सांगितले की तुम्ही या साेवळ्यातच चांगले दिसता. तसेच कायम राहा. साधु, महंत जाताना तुम्हालाच ते बराेबर नेऊन साधु बनवतील, असे महाजन यांनी सांगताच हास्यस्फाेट झाला. गिरीश महाजन यांनी संपूर्ण साेहळ्यात साेवळेच परिधान केले हाेते. कार्यक्रमातील त्यांचे भाषण झाल्यानंतरच त्यांनी शर्ट, पॅन्ट परीधान केली.
देशातला सर्वाेत्तम
कुंभ व्हावा : पालकमंत्री

यंदाचा कुंभमेळा हा देशातला सर्वाेत्तम कुंभ व्हावा यासाठीच अामचे प्रयास अाहेत. केवळ लाेकसहभागातूनच ते शक्य हाेणार अाहे. शासनाने केवळ व्यवस्था उपलब्ध करुन दिली असून संत, महंतांना अाणि भाविकांनाच हा कुंभ यशस्वी करायचा असल्याचे कुंभमंत्री महाजन यांनी सांगितले. जगातला सगळ्यात माेठा इव्हेंट भरवताना त्यात थाेडेफार वादविवाद झाले तरी ते क्षम्य असतात. काहीवेळा ग्यानदास महाराजांशीदेखील मतभेद झाले, मात्र काही काळाने तेदेखील दूर झाल्याचे महाजन यांनी नमूद केले.