आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साधुग्रामसाठी जागा कायमस्वरूपी घ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- साधुग्रामसाठी भाडेतत्त्वावर जमीन अधिग्रहित करण्यात येणार असून, सोमवारी (दि. २२) आपले म्हणणे मांडण्यासाठी बोलविण्यात आलेल्या शेतक-यांनी भाडेतत्त्वावर जागा देण्यास नकार दिला. कायमस्वरूपी जागा संपादित करण्याची व त्यासाठी बाजारभावाप्रमाणे दर देण्याची मागणी केल्याने आता ऐनवेळी प्रशासनाची गोची झाली आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी १४ महिने कालावधीसाठी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहणासाठीच्या नोटीसही बजावल्या आहेत. मात्र, गेल्या वेळी भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनींचे प्रचंड नुकसान झाले होते. तीच स्थिती पुन्हा उद‌्भवण्याची शक्यता असल्याने आता जमिनी सरळ बाजारभावानुसार शासनाने खरेदी कराव्या, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. परंतु, यामुळे प्रशासनाची गोची झाली असून, कायमस्वरूपी खरेदीसाठी पालिका हे समुचित प्राधिकरण आहे. त्यांनीच ती खरेदी करणे अपेक्षित असून, तूर्तास जिल्हा प्रशासन जमीन अधिग्रहित करत आहे. त्यांना कायमस्वरूपी जमीन संपादित करण्याचे अधिकार नसल्याने शेतकऱ्यांचा उद्रेकाचा सामना प्रशासनाला करावा लागणार आहे. दर निश्चितीसाठी समिती : जमिनींच्या भाडे दर निश्चितीसाठी पाच सदस्यीय समिती नेमण्यात आली असून, ही समिती तेथे महिनाभरात अहवाल जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना सादर करणार आहेत.