आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लॅण्ड बँक’मुळे थांबणार उद्योगांची वणवण, ‘मेक इन इंडिया’च्या ना-यानंतर सुलभ धाेरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी दिलेल्या ‘मेक इन इंडिया’च्या ना-यानंतर ख-या अर्थाने उद्याेगांकरिता सुलभ धाेरण अाणण्याकरिता प्रयत्न केले जात अाहेत. महाराष्ट्रात उद्याेगांकरिता जागाच उपलब्ध नसल्याच्या तक्रारी अनेक शहरांतून उद्याेजक संघटना करीत असल्याने सरकारने त्यावर उपाय म्हणून ‘लॅण्ड बँक’ निर्माण करण्याची याेजना अाखली अाहे. याकरिता सध्याच्या अस्तित्वात असलेल्या अाैद्याेगिक वसाहतींच्या लगत असलेल्या जमिनींची माहिती विविध वर्गवारीत संकलित करण्यात येत अाहे.

उद्याेगांना सहज सुलभ त्वरित जमीन उपलब्ध करून देता यावी, याकरिता जिल्हा उद्याेग केंद्रांनाच त्यांच्या क्षेत्रातील अाैद्याेगिक वसाहतींची निवड करून या वसाहतींच्या लगत असलेल्या उद्याेगांकरिता लॅण्ड बँक निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकणा-या जमिनींच्या उता-यांची प्रत गुरुवारी हाेणा-या बैठकीत सादर करावी लागणार अाहे. नाशिकमध्ये प्राधान्याने गाेंदे, वाडीवऱ्हे या दाेन्ही अाैद्याेगिक वसाहतींची त्याकरिता निवड करण्यात अालेली असून, त्याचा अहवाल या बैठकीत सादर केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या उद्याेगांवर लक्ष करण्यात अाले केंद्रित : लॅण्डबँक निर्माण करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावयाची अाहे. त्याकरिता केवळ हरित उद्याेग वर्गात माेडणारे उद्याेग, घातक प्रकारातील उद्याेग, सर्व प्रकारातील उद्याेग अाणि उद्याेग विरहित जमीन अशी वर्गवारी करून त्यांच्यासंदर्भात नियाेजन करण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत. तसेच तेथील पाणी, वीज, सांडपाण्याची व्यवस्था, रस्ते यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती मागविण्यात अाली अाहे. पारदर्शी अाणि कालनिर्धारित जमीन हस्तांतरण प्रक्रियेच्या अाणि जमिनीच्या वापराचा उद्देश बदलण्याकरिता धाेरण ठरविण्याबाबतच्या बाबी निश्चित करण्याबाबत अादेश देण्यात अाले अाहेत.

अनेक उद्याेग जागेअभावी नाशिकबाहेर
नाशिकमध्येजागा उपलब्ध नसल्याने गेल्या बारा वर्षांत एकही माेठा उद्याेग अाला नसल्याचे वास्तव अाहे. याशिवाय सध्या या अाैद्याेगिक वसाहतींमध्ये अनेक माेठ्या कंपन्यांना अापला विस्तारीत प्रकल्प पुरेशा जागेअभावी गुजरातेतील सानंद किंवा पुण्याजवळील चाकण येथे स्थलांतरित करावा लागल्याचे वास्तव अाहे. हे टाळण्यासाठीच लॅण्ड बँक निर्माण करण्याची याेजना अाकारास अाणण्याचे नियाेजन अाहे.

गाेंदे-वाडीव-हे, अंबड वसाहतींची चाचपणी
गाेंदे-वाडीवऱ्हेअंबड या अाैद्याेगिक वसाहतींच्या बाहेरील खासगी मालकीच्या जागा, खासगी अाैद्याेगिक वसाहती, विकसकांनी व्यक्तिश: विकसित केलेल्या एनए प्लाॅटस‌्ची चाचपणी लॅण्ड बँकेकरिता करण्यात अाली.

मंत्रालयात अाज मांडणार अहवाल
मंत्रालयातयासंदर्भात गुरुवारी एप्रिल राेजी उद्याेग विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक हाेत अाहे. त्यात प्रत्येक जिल्ह्यातील उद्याेग केंद्राकडून या लॅण्ड बँकेकरिता उपलब्ध जागांचा अहवाल सादर केला जाईल.