आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Land For Garden Having To Corporation , But SIngal Garden

महापालिकेकडे जागा आहे, मात्र बाग नाही

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - माजी महापौर बाळासाहेब सानप यांच्या कारकिर्दीत श्रीकृष्णनगर उद्यान विकसित झाले. या उद्यानात 80 टक्के लॉन्स असून, मुलांसाठी झोके, घसरगुंडी, मेरीगो राउंड, दोन सिसॉ, एक मिनी ट्रेन आहे. मात्र, ही ट्रेन दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या उद्यानातील कारंजाही बंद आहे. सायंकाळी परिसरातील नागरिक येतात. उद्यानात पाणीपुरवठय़ाकरिता अर्धा इंची जलवाहिनी असून, पंचवटी परिसरातील सर्वात चांगले उद्यान म्हणून हे नावरूपास आले आहे. सरस्वतीनगर येथील प्रमोद महाजन उद्यानही पसंतीचे ठरत आहे.

हिरावाडीतील विरंगुळा उद्यान हे फक्त पाच गुंठे जागेत असून, या उद्यानाची जबाबदारी येथील जेष्ठांनी घेतली आहे. येथे जेष्ठ नागरिक पुस्तके वाचतात. याच ठिकाणी छोटे वाचनालयदेखील नागरिकांनी बनवले आहे.

वीर सावरकर उद्यानाचे चार वर्षांपूर्वी काम सुरू झाले होते. या ठिकाणी मोठे लॉन्स असून, या ठिकाणी वि. दा. सावरकरांचे स्मारक, ग्रंथालय, ओपन थिएटर आहे.

येथे आहे आरक्षित उद्यानांच्या जागा : वाल्मीकनगर, प्रभाग 10 येथे उद्यानासाठी वॉल कंपाउंड तयार आहे. परंतु, अद्याप विकसित करण्यात आले नाही. द्वारकानगरी उद्यानाच्या कामाचे कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही काम पूर्ण झालेले नाही. ठेकेदार बिल काढून फरार झाला असल्याचे सांगितले जाते. स्वामीनगर येथेही उद्यानासाठी जागा आरक्षित आहे. कर्णनगर येथे उद्यान विकसित करण्याचा प्रस्ताव मंजूर असूनही वादामुळे काम मागे पडले आहे.
दुरवस्था झालेली उद्याने

शिवकृपानगर- प्रभाग 3, सुदर्शन कॉलनी- प्रभाग 8, शांतिनिकेतन गार्डन- प्रभाग 3, आडगाव उद्यान- प्रभाग 1 या ठिकाणी पुरेसे लॉन नाही. खेळणी कमी असल्याने मुलांना एका खेळासाठी खूप वेळ वाट बघावी लागते. खेळात कधी कधी मुलांचे वादही होतात. पाणी नसल्याने आणि देखभालीअभावी झाडे सुकली असल्याने उद्याने ओसाड भासत आहेत. अनेक वर्षांपासून या उद्यानांची अवस्था बकाल असून, मनपाच्या उद्यान विभाग आणि नगरसेवकही कधी उद्यान विकसित करण्याकरिता धजावत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

खेळणी कधी येणार
प्रमोद महाजन उद्यानात खूप चांगले आहे. मात्र, येथे खेळणार्‍या मुलांची संख्या जादा आहे व खेळणी कमी असल्यामुळे त्यात वाढ झाली पाहिजे. प्रसाद पाटील
पाणी मिळावे
अनेक उद्यानांत पिण्याच्या पाण्यासाठी सुविधा करावी. खेळून दमल्यानंतर पाणी पिण्याकरिता घरी जावे लागते. बोअरचे पाणी प्यावे लागते. सृष्टी गोळे
समन्वयाचा अभाव
उद्यानांचा विकास होण्यासाठी नगरसेवक, पालिकेचे अधिकारी, आणि नागरिकांमध्ये समन्वय पाहिजे, तरच उद्याने चांगल्या प्रकारे विकसित होतील. बाळासाहेब सानप, नगरसेवक

पाण्याअभावी अडचणी
पंचवटीत पाण्याअभावी उद्यानांचा विकास मागे आहे. नवीन तरतुदीनुसार विकास होईल, असे नगरसेवक सांगतात. पण, ज्या ठिकाणी पाणी आहे, तेथेच उद्यान विकसित करण्यात यावे. आर. ए. गायकवाड, उद्यान निरीक्षक, पंचवटी विभाग