आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिकमध्ये फेसबुकवरील फोटोआधारे भूखंड बळकावण्याचा प्रकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- फेसबुकवरील फोटोआधारे बनावट कागदपत्र तयार करून शेजारच्या व्यावसायिकाचा भूखंड परस्पर बळकावण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर इगतपुरी पोलिसांत अजीम अब्दुल लतिफ हाजू याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, दोन दिवस उलटूनही संशयिताला अटक होत नसल्याने, पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जातो आहे.

तळेगाव बुद्रुक येथील 1100 चौरस मीटरचा भूखंड संशयिताने मूळ मालक नितीन पद्माकर पंडित (नाशिकरोड) यांच्या फेसबुकवरील छायाचित्राच्या आधारे खरेदीखताचे कागदपत्र तयार करून व्यवहार झाल्याचे दाखविले. ते दुय्यम निबंधक कार्यालयात सादर करून साक्षीदार, नोटरीच्या नावाने सुमारे 20 लाखांत भूखंड खरेदीचा व्यवहार दाखविला.

इगतपुरी पोलिसांची भूमिका संशयास्पद
संशयित हाजू हा सत्ताधारी कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्याचा व मंत्र्यांचा सर्मथक असल्याचे भासवत असल्याने पोलिसांकडून त्यास दोन दिवस उलटूनही अटक झालेली नाही. महिनाभर इगतपुरी पोलिसांकडे गुन्हा दाखलसाठी पाठपुरावा करुनही टाळाटाळ होत होती. अखेर पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करताच गुन्हा दाखल करण्यात आला.

अटकेची कारवाई सुरू
हाजू याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होताच तो फरार झाला असून, त्याच्या अटकेसाठी स्वतंत्र पथकाद्वारे शोध घेतला जात आहे. अटकेची कारवाई केली जाणार असून, तपासात आणखी दोघा-तिघांचा सहभाग आढळून येण्याची शक्यता आहे.
-आर. एस. परदेशी, सहा. पोलिस निरीक्षक