नाशिक - कोट्यवधी रुपये किंमतीचा भूखंड खरेदीचा व्यवहार न्यायप्रविष्ठ असल्याचे माहित असतानाही प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी बनावट कागदपत्रांद्वारे दुसरा व्यवहार करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी लेखापरिक्षक मुकूंद कोकीळ यांच्या तक्रारीनुसार वाडकर यांच्यासह चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काेकीळ यांनी देवळाली शिवारातील ६६०० चौरस मीटरचा प्लॉट खरेदी केला होता. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही गायक सुरेश वाडकर यांनी पुढाकार घेत धोपावकर, करंदीकर व शिंदे यांच्याकडून परस्पर प्लॉट खरेदीची बनावट कागदपत्रे तयार करून घेतली. याबाबत कोकिळ यांनी न्यायालयात धाव घेतली होती.