आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेत सोमवारीही आढळले २९२ लेटलतिफ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महापालिकेतील बेबंदशाहीला लगाम लावण्यासाठी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी लेटलतिफांवर कारवाईची मोहीम सुरूच ठेवली आहे. सोमवारी मुख्यालयासह विभागीय कार्यालयातील अहवालानुसार, तब्बल २९२ कर्मचारी उशिरा आल्याचे आढळून आले.

सूत्रे स्वीकारताच कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचे काम आयुक्तांनी हाती घेतले. आयुक्तांनी घेतलेल्या माहितीनुसार, सोमवारी मुख्यालयातील ६८ कर्मचारी वेळेवर कामावर आले नाहीत. सर्वच लेटलतिफांना महापालिकेमार्फत नोटीस देण्यात आल्या आहेत. त्यांचा खुलासा असमाधानकारक आल्यास त्यांची वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

विभागवार
मुख्यालय६८
पूर्व ३७
पश्चिम २३
सिडको ६०
पंचवटी ४४
सातपूर २१
नाशिकरोड ३९
एकूण२९२