आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Late Night' Dealers Challenge To Administration

‘लेट नाइट’ विक्रेत्यांचे प्रशासनालाच आव्हान, अशा विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करणार...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड या मध्य रेल्वेच्या मार्गावरील अति महत्त्वाच्या स्थानकास विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. लाखो भाविक शहरात दाखल होणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज असून, त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे. शहर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिस प्रशासनाने हातगाड्या, तसेच इतर विक्रेत्यांनादेखील रात्री १० वाजेनंतर विक्री बंद करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. याकामी पोलिस प्रशासनाकडून नेमण्यात आलेल्या गस्त पथकाकडून मात्र केवळ देखाव्यापुरती कारवाई होत असल्याने हे पथक नजरेआड होताच पुन्हा विक्री सुरू करीत हे व्यावसायिक प्रशासनालाच आव्हान देत आहेत. विशेष म्हणजे, याबाबत पोलिसांना माहिती असूनही त्यांच्याकडून कारवाई होत नसल्याचे ‘डी.बी. स्टार’च्या पाहणीत दिसून आले.

रेल्वेस्थानक परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या विक्रेत्यांकडून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने या परिसरात गैरप्रकारांचे प्रमाणदेखील वाढत आहे. मद्यपींकडून रात्रीच्या सुमारास होत असलेला धिंगाणा, महिलांच्या छेडछाडीचे वाढते प्रकार, भांडणे, हुल्लडबाजीचे प्रकार घडत असल्याने रेल्वेस्थानकात येणाऱ्या प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने शहरात दाखल होणाऱ्या प्रवाशांना लुटण्याचे प्रकारदेखील वाढू लागल्याने पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात या विक्रेत्यांवर पोलिसांचा कुठल्याही प्रकारचा अंकुश नसल्याने समस्या कायम आहे.

बाह्यितकीट विक्रीलाही फटका
सिंहस्थातप्रवाशांची रेल्वे स्थानकाच्या तिकीट केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने स्थानकाबाहेर तिकीट विक्री केंद्र सुरू केले आहे. मात्र, स्थानकाबाहेरील एका टपरीत रेल्वेने हे तिकीट विक्री केंद्र दिले असून, याठिकाणी सायंकाळनंतर मद्यपींचा वावर वाढतो. त्यामुळे अशा केंद्रावर पुरुष तसेच, महिला प्रवासी तिकीट घेण्यास सहजपणे धजावत नसल्याचे ‘डी.बी. स्टार’च्या पाहणीत दिसून आले. या बाबीकडेदेखील रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

उशिरापर्यंत होते छुप्या पद्धतीने मद्य विक्री
राज्यउत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार रात्री १० वाजेपर्यंतच मद्य विक्री करता येते. मात्र, नाशिकराेड रेल्वेस्थानक परिसरातील काही मद्यविक्रेत्यांकडून छुप्या पद्धतीने रात्री उशिरापर्यंत मद्य विक्री सुरू असते. त्यामुळे परिसरात रात्री उशिरापर्यंत मद्यपींचा गोंधळ सुरू असतो. अनेकदा पोलिसांचे गस्त पथक येथून जाते. मात्र, याकडे त्यांचेही दुर्लक्षच होते. यामुळे पोलिसांच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित होते.

या विक्रेत्यांवर मेहेरनजर का?
स्थानकपरिसरात ‘डी.बी. स्टार’च्या पाहणीत गेल्या पाच दिवसांत एकदाही रात्री पोलिस फिरकल्याचे दिसून आले नाही. शहरात एकीकडे रात्री दहा वाजेनंतर पोलिसांकडून खाद्यपदार्थ, तसेच चायनिज पदार्थ विक्रेत्यांना बंदी घातली जात असताना सर्वाधिक वर्दळ असलेल्या या परिसरातील विक्रेत्यांवर मेहेरनजर का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वाहतुकीचा खोळंबा ही नित्याचीच बाब
रेल्वेस्थानकाबाहेरपानटपरी, चहा तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे गाडे लावण्यात आले आहेत. या गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने याठिकाणी वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. रेल्वेस्थानकावरून हजारो प्रवासी मुंबई तसेच इतरत्र ये-जा करत असतात. या लोकांना स्थानकावर ड्राॅप करण्यासाठी किंवा घेण्यासाठी येणाऱ्या वाहनांचीदेखील बेशिस्त पार्किंग होत असल्याने या समस्येत भर पडत आहे.

गुन्हेगारीला मिळतेय खतपाणी
परिसरातीलहातगाड्यांवर रात्री उशिरापर्यंत मद्यपी, टवाळखोरांचा वावर सुरू असल्याने प्रवाशांची लूटमार, महिलांशी गैरवर्तन, वाद, भांडण, हाणामाऱ्या अशा प्रकारांत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. विशेष म्हणजे, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पोलिसांसमोर असताना या प्रकारांमुळे मात्र गुन्हेगारीलाच खतपाणी घातले जात असल्याचे स्पष्ट होते. पोलिस प्रशासनाने अशा प्रवृत्तींना आळा घालत कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
थेट प्रश्न
पोलिसांची भूमिका संशयास्पद; सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवरही सुरक्षिततेबाबत उदासीनताच
शहरातील गुन्हेगारीचा वाढता आलेख पोलिस प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत असताना, मध्य रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे असलेल्या नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडूनदेखील नियमांची पायमल्ली करीत या समस्येत भर टाकली जात आहे. अशा विक्रेत्यांना प्रशासनाकडून रात्री १० वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली असतानादेखील मध्यरात्री उशिरापर्यंत याठिकाणी मद्य, तंबाखूजन्य पदार्थ तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांची दुकाने सुरू असल्याने गैरप्रकारांना खतपाणी मिळत आहे. पोलिस प्रशासनाच्या या संशयास्पद भूमिकेमुळे परिसरातील विक्रेत्यांना मोकळे रान मिळत असून, याचा त्रास मात्र सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नियोजनाचे पाढे वाचणाऱ्या प्रशासनाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्षच केल्याचे ‘डी.बी. स्टार’च्या पाहणीत दिसून आले.
- खाद्यपदार्थतसेच मद्यविक्रीला १० वाजेपर्यंत परवानगी असताना स्थानकाबाहेर उशिरापर्यंत विक्री सुरू असते, त्याचे काय?
रात्रीउशिरापर्यंत कुणालाही दुकाने उघडी ठेवण्यास आम्ही परवानगी दिलेली नाही. आमचे गस्तपथक रोज रात्री १० वाजता पाहणी करत असते आणि व्यावसायिकांना विक्री बंद करण्याबाबत सूचना देत असते.

- तरीदेखीलिवक्री सुरू असल्याचे दिसून येते. अशा विक्रेत्यांवर कधी कारवाई करणार?
आमचीकारवाई सुरूच असते. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक कठोर कारवाई करून रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या गाड्या, दुकानांना सूचना करणार.