आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारणातून 20 हजार क्युसेकचा जलौघ औरंगाबादच्या दिशेने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुके, नाशिक शहरासह धरणांच्या पाणलोटात संततधार सुरू आहे. दारणा धरणातील साठा 73 टक्के झाला असून, मंगळवारी दुपारी 3 वाजता 3 हजार क्युसेक तर रात्री 10 वाजता 16,772 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. पाणलोटात मंगळवारी 24 तासांत 49 मिमी पाऊस पडल्याने धरणात 5,143 दलघफू पाणी आहे. एक्स्प्रेस कालवा व गोदावरी नदीतून हे पाणी औरंगाबाद जिल्ह्यात दाखल होणार आहे. तसेच जायकवाडीवरील गंगापूर धरणातही 51 टक्के (2875 दलघफू) साठा झाला आहे.

नाशकात अतिवृष्टी
नाशिक शहरात मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 55.9 मिलिमीटर, तर साडेआठ वाजेपासून दुपारी 2.30 वाजेपर्यंत 22.2 मिलिमीटर म्हणजे 30 तासांत 78.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 29 जुलै रोजी इगतपुरी तालुक्यात 256 मिलिमीटर पर्जन्य नोंदविले गेले.