आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

73 तासांत दारणाचे पाणी जायकवाडीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गंगापूर धरण 70, तर दारणा 77 टक्के भरले आहे. नांदूर मधमेश्वर धरणही तुडुंब भरले असून, सहा दरवाजांतून 31,130 क्युसेक पाणी सोडण्यात आले.दारणातून सोडलेल्या विसर्गात बुधवारी सायंकाळी 6 वाजता 11,592 क्युसेकने वाढ करण्यात आली. हे पाणी नांदूर मधमेश्वरपर्यंत पोहोचण्यास 25, तर तेथून जायकवाडीत पोहोचण्यास 48 तास लागणार आहेत.

दारणातून मंगळवारी दुपारी 3 वाजता 3 हजार, तर रात्री 10 वाजता 16,772 क्युसेक विसर्ग होता. दोन दिवसांत मिळून एकूण 27,592 क्युसेकचा विसर्ग करण्यात आला. नांदूर-मधमेश्वर धरणास आठ दरवाजे असून त्यांची 1 लाख 20 हजार क्युसेक एवढी विसर्गक्षमता आहे.