आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : मनसेच्या काळातही लावणीचा ‘बार’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीत मानाचे स्थान असलेल्या लावणीला सध्या काही कलाकारांनी अश्लाघ्य रूप दिले असून, प्रेक्षकांनीही लावणीचा बाज बिघडवला आहे. महाकवी कालिदास कलामंदिरात लावणीच्या नावाने चाललेल्या अश्लीलतेने आणि धिंगाण्याने नाशिककरांना अस्वस्थ केले असताना, मराठीची अस्मिता जपणार्‍या मनसेला मात्र त्याचे कोणतेही सोयरसुतक दिसत नाही. कलामंदिरातील अश्लील प्रकार रोखण्यासाठी आणि प्रेक्षकांचा धुडगूस थांबविण्यासाठी महापौरांनी भरपूर आश्वासने दिली असली तरीही त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही. त्यामुळे किमान आता तरी अशा प्रकारच्या कृत्याला ‘मनसे’स्टाइल बंदी घातली जावी, अशी सर्वसामान्य नाशिककरांना अपेक्षा आहे.