आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटी रद्दसाठी पेट्राेल पंपचालक अाक्रमक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शासनाने अाॅगस्टपासून एलबीटी रद्दची घाेेषणा केली असून, त्यात पेट्राेल-डिझेलही 'एलबीटी'मुक्त करावे, अशी मागणी पुन्हा पुढे अाली अाहे. हा निर्णय झाल्यास पुढील महिन्यात राज्यातील पेट्राेल पंपचालक अांदाेलन छेडण्याच्या तयारीत अाहेत. या संदर्भाने मुंबईत बैठक झाली असून, गुरुवारी (दि. ३०) मुख्यमंत्र्यांनाही शिष्टमंडळ भेटण्यास गेले हाेते. मात्र, सायंकाळपर्यंत त्यांची भेट हाेऊ शकली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली अाहे.

राज्य सरकारने एलबीटी रद्द करण्याची अधिसूचना जारी केली असली, तरी त्यात स्पष्टता नाही. राज्यातील २५ महापालिकांत एलबीटी लागू असून, तेथे िडझेल अाणि पेट्राेलवर हा कर अाकारला जाताे, ज्यातून सुमारे २७५ काेटींचे कर संकलन हाेते. मात्र, यामुळे महापालिका हद्दीतील पंपांवर हद्दीबाहेरील पंपांपेक्षा जवळपास प्रतिलिटर २.४५ रुपये ग्राहकाला जास्त माेजावे लागत अाहेत. यामुळे ग्राहक महापालिका हद्दीबाहेरील पंपांवर इंधन टाकण्यास पसंती देत असून, शहरातील पंप मात्र अाजारी अवस्थेत पाेहाेचले अाहेत. 'एलबीटी'मुक्त महाराष्ट्र करत 'एक महाराष्ट्र एक कर' असावा, ही पेट्राेल पंपचालकांची मागणी अाहे.

स्टेटस्पेसिफिक टॅक्सचे अाेझे काढा : मुंबईतील रिफायनरीजमध्ये येणाऱ्या कच्च्या तेलावर मुंबई महापालिका जकात अाकारते. मात्र, त्याचा भुर्दंड संपूर्ण राज्यातील जनता सोसते. या करापाेटी राज्यात प्रतिलिटर पेट्राेल-डिझेलमागे अडीच रुपये माेजावे लागत असून, हा कर रद्द व्हावा, हीदेखील पेट्राे डीलर्स असाेसिएशनची प्रमुख मागणी अाहे.
४००० दरराेज एका पंपावरून पेट्राेलविक्री सरासरी लिटर
२५०० लिटर सरासरी दरराेज एका पंपावरून डिझेलविक्री
५० महापाालिका हद्दीतील पंप (अंदाजे)

..तर छेडणार अांदाेलन
जरशासनाने पेट्राेल पंपचालकांच्या या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर १० अाॅगस्टला एक दिवसाचा अाणि ११ अाॅगस्टपासून दरराेज अाठ तास पंप चालविण्याचे अांदाेलन करण्याची रणनीती अाखली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली अाहे.