आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटी रद्द हाेऊनही स्वस्त इंधनाची प्रतीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्थानिक स्वराज्य संस्था (एलबीटी) कर रद्द हाेऊनदेखील शहरातील ग्राहकांना स्वस्त पेट्राेल डिझेल मिळत नसल्याने नाशिक जिल्हा पेट्राेल डिलर वेलफेअर असाेसिएशन अाक्रमक झाली असून, १० अाॅगस्टला काम बंद, तर ११ अाॅगस्टपासून सकाळी अाठ ते दुपारी चार या एका शिफ्टमध्येच काम करण्याचा निर्णय घेतला अाहे. त्यामुळे जर असाेसिएशनने हे अांदाेलन केले तर नागरिकांची माेठी गैरसाेय हाेण्याची शक्यता अाहे.
राज्य शासनाने राज्यात जकात रद्द करून एलबीटी लागू केला. त्यामुळे महानगरपालिकेने डिझेल, पेट्राेल विक्री-खरेदीवर एलबीटी वाढवला. तरीही पेट्राेल डिझेल पंपमालकांनी वेळाेवेळी सातत्याने एलबीटी भरला. मात्र, इतर व्यापाऱ्यांकडून नियमितपणे एलबीटी भरल्याने त्याचा भार पेट्राेल डिझेल पंपावर अाला. त्यामुळे शहरातील वाहनधारकांना दाेन ते तीन रुपये जादा दराने पेट्राेल डिझेल खरेदी करावे लागले. शासनाने अाता ५० काेटींच्या खालील व्यवहारांवर एलबीटी माफ करूनही पेट्राेल कंपन्या अाणि महानगरपालिकांमध्ये नसलेल्या समन्वयामुळे अाजही एलबीटी अाकारणे सुरूच अाहे. यामुळे शहरातील सामान्य ग्राहक अाणि पेट्राेल पंपचालक भरडून िनघत अाहेत. एकूणच ग्राहकांना स्वस्त दरात पेट्राेल डिझेल मिळणे सध्या तरी दुरापास्त असल्याने िजल्हा पेट्राेल डिलर वेलफेअर असाेसिएशनने अांदाेलनाचा पवित्रा घेतला अाहे.

शासनानेच या विषयात तात्काळ लक्ष घालावे
शासनाने पेट्राेल डिझेलवर लागणाऱ्या एलबीटीवर तात्काळ लक्ष घालून एलबीटी रद्द करावा यातून पेट्राेल पंपचालकांची सुटका करून द्यावी. त्यानंतर ग्राहकांना स्वस्त दरात पेट्राेल मिळू शकेल. पण त्याच्या कृतीसाठी राजकीय इच्छाशक्तीची खरी गरज अाहे. विजय ठाकरे, सचिव, नाशिक जिल्हा पेट्राेल डिलर वेलफेअर असाेसिएशन

या दरात मिळू शकते पेट्राेल, डिझेल...
एलबीटीया विषयावर सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. पण शहरात पेट्राेल डिझेलवरील एलबीटी रद्द झाल्यास पेट्राेल २.१५ पैसे, तर डिझेल १.७० पैसे स्वस्त हाेऊ शकते. शहरात पेट्राेलचा दर प्रतिलिटर ७१.१५ पैसे, तर डिझेल प्रतिलिटरसाठी ५२.५४ पैसे इतका अाहे. यात वरीलप्रमाणे बदल झाला, तर ग्राहकांना अाणखी कमी दारत पेट्राेल-डिझेल मिळेल.