आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटी कारवाईत टपालाचा खोळंबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एलबीटी विवरणपत्र भरणाऱ्या व्यापाऱ्यांची बँक खाती गाेठवण्याची कारवाई थांबवण्यासाठी एकीकडे व्यापारी मुख्यमंत्र्याकडे दाद मागत असतानाच टपाल खात्याच्या भाेंगळ कारभारामुळे पालिकेच्या कारवाईला परस्पर ब्रेक लागल्याचे उघड झाले अाहे. पहिली नाेटीस व्यापाऱ्यंाना देणाऱ्या टपाल खात्याकडून दुसऱ्या नाेटिसीला चक्क पत्ताच सापडत नाही असे उत्तर देणारे शेरे येऊ लागल्यामुळे एलबीटी विभाग अवाक् झाला अाहे. या प्रकरणी पालिकेने टपाल खात्याला पत्र देऊन नेमके काय ते शाेधण्याची विनंती केली अाहे.
वारंवार सूचना करूनही १६ हजार व्यापाऱ्यांनी एलबीटीचे विवरणपत्र सादर केलेले नव्हते. एलबीटी विवरणपत्रात खरेदी-विक्रीची वार्षिक माहिती अपेक्षित असून, त्याद्वारे खराेखरच अशी उलाढाल झाली का त्यानुसार याेग्य वसुली झाली का, याची पडताळणी मनपा विभागाला करायची अाहे. त्यासाठी विहित मुदतीत विवरणपत्र सादर केल्यामुळे १६ हजार व्यापाऱ्यांना नाेटीस काढून मुदतीत विवरणपत्र सादर केल्यास पाच हजार रुपये दंड करण्याचा इशारा मनपानेदिला हाेता. त्यानुसार दाेन हजार व्यापाऱ्यांनी दंड भरला. मात्र १४ हजार व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली हाेती. अखेर त्यांची बँक खाती गाेठवण्याची कारवाई मनपाने सुरू केली. अातापर्यंत ९०० व्यापाऱ्यांची खाती गाेठवली असून, दुसरीकडे कारवाई राेखण्यासाठी व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली अाहे. मात्र त्यांच्याकडून अाश्वासनापलीकडे काहीमिळत नसल्याने कारवाई टाळण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी दंडही भरला. पालिका कारवाईच्या मूडमध्ये असताना टपाल खात्याकडून उर्वरित नाेटिसा व्यापाऱ्यांपर्यंत पाेहाेचवल्या जात नसल्याचे उघड झाले. याची माहिती घेतल्यावर पालिकेला विचित्र अनुभव अाला. अाठ हजार व्यापाऱ्यांपर्यंत दुसरी नाेटीस पाेहचलीच नाही. विवरणपत्र सादर करा अन्यथा पाच हजार रुपये दंड, अशी नाेटीस व्यापाऱ्यांपर्यंत पाेहचली अाहे. मात्र, त्यानंतर दंड भरल्यास बँक खाती गाेठवण्याचा इशारा देण्यारी नाेटीस पत्ताच सापडत नसल्याचे कारण देत टपालखात्यामार्फत परत अाली अाहे. जर पहिली नाेटीस व्यवस्थित पत्त्यावर पाेहचते, तर दुसरी का नाही, असा प्रश्न पालिकेला पडला अाहे. या प्रकरणात तळाकडील टपाल यंत्रणेकडून काही दाेष तर राहात नाही ना, याची तपासणी करण्याची मागणी मनपाने केली अाहे.