आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोठवलेली बँक खाती होणार खुली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एलबीटीविवरणपत्र दाखल केलेल्या व्यावसायिकांना दंडाच्या नोटिसामिळत असून, पाच हजारांचा दंड महापालिकेकडून सर्रासपणे वसूल केला जात आहे. तर, पाचशेवर व्यावसायिकांची बँक खातीही गोठविण्यात आलेली आहेत. ही गोठवलेली बँक खाती खुली होण्याची शक्यता असून, कारवायांचा जोरही ओसरणार असल्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे आदेशच दूरध्वनीव्दारे महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना दिल्‍याची माहिती विश्वसनीय उच्चपदस्थ सूत्रांकडूनमिळाली आहे.

सांगली महापालिकेने बँक खाती गोठविण्याच्या केलेल्या कारवायांमुळे तेथील व्यापाऱ्यांत तीव्र संताप असून, तेथील व्यापारी नेत्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. नाशिकमध्येही महापालिकेकडून व्यापाऱ्यांवर कारवाया सुरू झाल्या असल्या तरी अद्याप काेणावरही फाैजदारी गुन्हे महापालिकेने दाखल केलेले नाहीत, मात्र बँक खाती गोठविण्यात आली आहेत, याचा संताप शहरातील व्यावसायिकांत आहे.

राज्यभरात एलबीटीवरून व्यापारी व्यावसायिक वर्गात खदखद व्यक्त होत असून, या असंतोषाबाबत फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ मर्चंटसच्या (फाम) नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून माहिती दिली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: दूरध्वनी करून नाशिकचे आयुक्त डॉ. गेडाम यांना तसेच सांगली महापालिकेच्या आयुक्तांना कारवाया थांबविण्याचे आदेश दिल्‍याची माहिती फामचे अध्यक्ष मोहन गुरुनानी यांनी दिली. एलबीटीही लवकरच रद्द करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्‍याचे गुरुनानी यांनी सांगितले. या शिष्‍टमंडळात नाग िवदर्भ चेंबरचे अध्यक्ष िदपेन अग्रवाल, खासदार संजय काका सांगलीच्या आमदारांचा समावेश होता.

महापालिका आयुक्त नॉट रिचेबल
महापालिकाआयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याशी याबाबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा भ्रमणध्वनी नॉट रिचेबल होता. मुंबईतील बैठकीकरिता ते गेलेे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नाशिकमध्येही निवेदन
महापालिकेनेव्यावसायिकांवर सुरू केलेल्या कारवाया त्वरित थांबवाव्यात, अशी मागणी फामचे उपाध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी बुधवारी महापालिका उपायुक्त हरिभाऊ फडाेळ यांच्याकडे केली. या वेळी फामच्या पदाधिकाऱ्यांसह राहुल डागा उपस्थित होते.