आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापाऱ्यांकडून होणार आठ कोंटींची वसुली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एलबीटीची विवरणपत्रे सादर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या १४ हजार व्यापाऱ्यांना अखेर महापालिका प्रशासनाने पाच हजार रुपये दंडवसुलीची अंतिम नाेटीस बजावली आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत जवळपास आठ कोंटी रुपयांचा महसूल दंडापोटी मिळणार आहे. दंड भरणाऱ्यांची बँक खाती गोठवण्याचा पवित्राही महापालिकेने घेतला आहे.

मध्यंतरी कर विभागाने एलबीटीची विवरणपत्रे व्यापाऱ्यांकडून मागवली होती. जेणेकरून व्यापाऱ्यांनी माल कोंठून खरेदी वा विक्री केला, त्याचा तपशील घेऊन विवरणपत्राआधारे एलबीटी भरणाऱ्या अन्य लोकांवर कारवाई करण्याचा प्रयत्न होता. पहिल्या टप्प्यात १७ हजार २६८ व्यापाऱ्यांना नाेटिसा बजावून विवरणपत्रे पंधरा दविसांत सादर करणाऱ्यांवर पाच हजार दंडाची कारवाई केली जाईल, असा इशारा िदला होता. त्या काळात जवळपास दोन हजार व्यापाऱ्यांनी एलबीटी विवरणपत्रे सादर केली, मात्र १६ हजार व्यापाऱ्यांनी एलबीटी विवरणपत्रे सादर करण्यास नकार िदला. त्यामुळे संबंधित व्यापाऱ्यांना अंतिम नाेटीस देण्यात आली, मात्र त्यालाही प्रतिसाद मिळाल्यामुळे आता सर्व व्यापाऱ्यांकडून पाच हजार रुपये दंडाची वसुली सुरू केली आहे.
..तरच मिळेल एलबीटी रिटर्न
नाेटीस मिळाल्यानंतर दंड भरण्यासाठी सात दविस मुदत आहे. एलबीटी रिटर्न मागितल्यास प्रथम पाच हजार दंड भरून पावती सादर करणे क्रमप्राप्त आहे. जे दंड भरणार नाहीत त्यांची बँक खाती गोठवणार असल्याचे उपायुक्त हरिभाऊ फडाेळ यांनी सांगितले.