आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशकात एलबीटी चुकविणार्‍या पाच संस्थांना पाचपट दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- एलबीटीसाठी नोंदणी न करणार्‍या व तो चुकविणार्‍या शहरातील पाच संस्थांकडून पालिकेने एकूण किमतीच्या पाचपट दंड आकारला आहे. पालिकेने एक लाख 64 हजारांचा दंड वसूल केला. एलबीटी लागू झाल्यापासून प्रथमच प्रशासनाकडून अशी कारवाई करण्यात आली आहे.

21 मे 2013 पासून एलबीटी लागू झाल्यानंतर मे मधील दहा दिवस व जून महिना मिळून 53 कोटी, तर जुलैमध्ये 40 कोटी रुपयांची वसुली झाली. या कालावधीत पालिकेला 80 कोटींचा तोटा झाला. एलबीटी नोंदणी न करणार्‍या व कर चुकविणार्‍या संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यात सहारा प्रदर्शन भरविणार्‍या संस्थेकडून एक लाख चार हजार, र्शी गणेश एंटरप्रायझेस 30 हजार 360, लॉट क्लॉथकडून 13 हजार 164, बॉम्बे फॅशनकडून 8,616 तर गल्र्स कलेक्शनकडून 5,654 रुपयांची दंड वसुली केल्याची माहिती उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांनी दिली.