आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एलबीटी’प्रकरणी नजरा माेदी-शहांकडे, राज्य सरकारकडून अद्यापही स्पष्टीकरण नाहीच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्यातून स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) पूर्णपणे रद्द व्हावा, याकरिता अाता व्यावसायिकांच्या नजरा पंतप्रधान नरेंद्र माेदी अाणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे लागल्या अाहेत. माेेदी अाणि शहा यांनी विधानसभेच्या प्रचारात राज्यभरातील व्यापारी समुदायाला ‘एलबीटी’ हद्दपार करण्याचे अाश्वासन िदले हाेते, त्याची पूर्तता अाता करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात अाहे.

दरम्यान, पन्नास काेटींवरील व्यवसायांना एलबीटी लागू ठेवण्याच्या तयारीत सरकार असल्याची चर्चा सुरू असून, यावर अद्यापही सरकारने काेणतेच स्पष्टीकरण िदलेले नसल्याने उद्याेगक्षेत्रात मात्र चिंतेचे वातावरण अाहे. महाराष्ट्रातील २५ महापालिकांत अाघाडी सरकारने जकातीएेवजी स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू केला हाेता. हा कर जाचक असल्याचा अाराेप करीत राज्यभरात व्यापारी संघटनांनी प्रदीर्घ अांदाेलन छेडले हाेते. त्यावेळी विराेधी पक्षात असलेल्या भाजपने सत्तेत अाल्यास पहिला िनर्णय एलबीटी रद्द करण्याचा घेऊ, असे अाश्वासन व्यापारी समुदायाला िदले हाेते. ‘लुटाे बांटाे टॅक्स’ अशा शब्दांत खुद्द माेदींनी या कराची भलामण केली हाेती. मात्र, प्रत्यक्षात भारतीय जनता पक्षाची राज्यात सत्ता अाल्यानंतर अाॅगस्टपासून एलबीटी रद्द करण्याची घाेेषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली हाेती. जसजशी ही तारीख जवळ येत अाहे, तसतशा नानाविध चर्चा रंगू लागल्या असून, पन्नास काेटींपर्यंत वार्षिक उलाढाल असलेल्यांनाच एलबीटीतून मुक्ती िमळणार असल्याचे सांगितले जात अाहे. याच मुद्द्यावरून अाैद्याेगिक क्षेत्रात िचंता वाढली अाहे. माेठ्या उद्याेगांना या िनर्णयाचा फटका बसणार अाहे. यामुळे अाैद्याेगिक संघटनाही अाक्रमक हाेण्याची िचन्हे अाहेत. राज्यभरात या चर्चा सुरू असल्या तरी अद्यापपावेताे सरकारकडून याबाबत ब्र ही काढल्याने व्यापाऱ्यांची िचंता वाढली अाहे.

राज्य सरकारने पूर्ण श्रेयाचे मानकरी व्हावे
^शंभरटक्के एलबीटी रद्द करण्याचा िनर्णय सरकारने घेऊन अर्धवट नाही तर पूर्ण श्रेयाचे मानकरी व्हावे, अशी अामची मागणी अाहे. एलबीटी रद्द करण्याचे अाश्वासन जनतेला देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र माेदी अाणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे अाता व्यापारी समुदायाच्या नजरा लागल्या अाहेत. राजूराठी, व्यापारी नेते, साेलापूर

एलबीटीरद्द व्हावा...
^पन्नासकाेटींवरील एलबीटी रद्द करण्याचा िनर्णय घेतला गेला तर ०.३ टक्के व्यावसायिक एलबीटीत अडकणार अाहेत. ‘फाम’चे अध्यक्ष माेहन गुरनानी याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून, पूर्णपणे एलबीटी रद्द करावा, हीच अामची मागणी अाहे ती हाेईल अशी अाशाही अाहे. प्रफुल्लसंचेती, उपाध्यक्ष, ‘फाम’
बातम्या आणखी आहेत...