आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एलबीटी लढ्याचा निर्धार अकरा हजार व्यापा-यांची साथ; आता कायदेशीर संघर्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- एलबीटी विवरणपत्रे सादर न करणाऱ्या सुमारे अकरा हजार व्यापाऱ्यांवर महापालिकेने नुकताच कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र, त्या विरोधात कायदेशीररीत्याच लढा देण्याचा निर्धार संघटनांनी व्यक्त केला असून अशाच कारवाईचा यापूर्वी सामना करणाऱ्या कोल्हापूर आणि सोलापूरच्या व्यापार मित्र संघटनेकडून मार्गदर्शन घेण्यात आले आहे. अशा प्रकारे ज्यांना नोटीस िमळाल्यानंतर संबंधित व्यावसायिकांनी मागणी केल्यास छापील उत्तराचा नमुनाही उपलब्ध करून दिला जाणार आहे.
वेळेत विवरणपत्र सादर न करणा-या व्यावसायिकांना नोटिसा बजावण्याचा आणि दंडात्मक कारवाईसह प्रसंगी बँक खातीही गोठवण्याचा इशारा महापालिकेने काही दिवसांपूर्वीच दिला होता. शहरात एलबीटीसाठी जवळपास २८ हजारांवर व्यावसायिकांची नोंदणी झालेली असून, ११ हजार व्यावसायिकांनी विवरणपत्र दिले नसल्याने किती मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांचा एलबीटीला विरोध आहे, हे स्पष्ट होत असल्याचे व्यापारी संघटनांच्या स्थानिक प्रतिनिधींनी सांगितले. मात्र, अशा प्रकारे कायद्यात कुठेही खाती गोठविण्याचा एकतर्फी अधिकार कोणालाही नसून, घाबरण्याचे कारण नाही. याच प्रकारची कारवाई सोलापूर-कोल्हापूर येथील महापालिकांनी केली होती. त्यानंतर व्यापार मित्र ने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने महापालिकेला बेकायदेशीर बाबी न करण्याचे निर्देश दिले गेले होते. हे प्रकरण आजही न्यायप्रविष्ट आहे. त्याच धर्तीवर नाशिकच्या व्यापा-यां मदत करण्यात येईल.