आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LBT News In Marathi, Tax Issue At Nashik, Divya Marathi

एलबीटीची विवरणपत्रे भरण्यासाठी 31 पर्यंत मुदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महापालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागाने नोंदणीकृत उद्योग-व्यावसायिकांकडून 31 मार्चअखेरपर्यंत वार्षिक विवरणपत्रे मागितली आहेत. यानंतर विवरणपत्रांची पडताळणी होऊन कर चुकविणार्‍या संस्थांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

मार्चअखेर खर्चाचे ताळेबंद जमविण्यासाठी अर्थ आणि कर विभागाची धावपळ सुरू झाली आहे. जकात रद्द झाल्यानंतर 22 मे 2013 रोजी राज्य शासनाने स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू केला. आता आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवसच बाकी असल्याने त्याचा ताळेबंद मिळविण्यासाठी कर विभागाने तयारी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने कर लागू झाल्यापासून आजतागायत नोंदणी केलेल्या व करभरणा केलेल्या संस्थांनी वार्षिक विवरणपत्रे भरून देण्याचे आवाहन उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांनी केले आहे.

98 लाखांचा दंड वसूल
22 मे 2013 ते 25 मार्च 2014 या कालावधीत एलबीटी विभागाने कर चुकवेगिरीची 317 प्रकरणे दाखल करून संबंधितांकडून 98 लाख 76 हजार रुपये दंड वसूल केला आहे.