आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेच्या वसुलीचा गाडा रुळावर; महिनाभरात मिळाले 53 कोटी; एलबीटी वसुलीत यश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकर: गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील व्यापा- यांचा रोष व आंदोलनामुळे एलबीटीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले असताना चालू महिन्यात मात्र महापालिका प्रशासनाच्या वसुलीचा गाडा रुळावर आला आहे. पालिकेला एलबीटीतून 48 कोटी, तर मुद्रांकावरील एक टक्का उपकरातून पाच कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे मासिक 55 कोटींचे उद्दिष्ट पुन्हा टप्प्यात आले आहे. महापालिकेची आर्थिक अवस्था बिकट झाल्यामुळे कोट्यवधी रुपयांची कामे रखडण्याची भीती होती. बिले मंजूर होत नसल्यामुळे ठेकेदारांनी कामेही थांबवल्याचे वृत्त होते. मे महिन्यात तर 35 कोटींपर्यंतच वसुली झाल्यामुळे कर्मचा- यांचे पगार व आस्थापना खर्चासाठीच पैसे उपलब्ध झाले होते. एलबीटी हटवण्यासंदर्भात शासनस्तरावर हालचाली सुरू असल्यामुळे व्यापारीही थांबून होते. मात्र, त्यासंदर्भात ठोस निर्णय होत नसल्याचे पाहून 20 जून ते 20 जुलै या कालावधीत पुन्हा एकदा एलबीटी भरण्याकडे व्यापा- यांचा कल वाढला आहे. त्यामुळे वसुलीचा गाडा पूर्वपदावर येत असल्याचे कर विभागातील अधिका- यांनी सांगितले.
तीन महिन्यांत दोनशे कोटी
एप्रिल ते जुलै या कालावधीत महापालिकेला 208 कोटी रुपये मिळाले असून, यंदा 735 कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे एलबीटीचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची आशा प्रशासनाला वाटत आहे.
तीस हजार व्यापा- यांनी केली एलबीटीची नोंदणी
यापूर्वी 29 हजार 500 व्यापा- यांनी एलबीटीची नोंदणी केली होती. त्यात आता वाढ होऊन हीच संख्या तीस हजारांपर्यंत गेल्याचेही अधिका- यांनी सांगितले.