आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटी न भरणार्‍या 261 व्यावसायिकांवर कारवाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मागील वर्षात एलबीटी नोंदणी न करणार्‍या तसेच निर्यात मालावर कर भरणा न करणार्‍या 261 उद्योग- व्यावसायिकांकडून 76 लाख 33 हजारांचा दंड वसूल करण्यात आला असून, एलबीटीच्या माध्यमातून एप्रिल ते डिसेंबरअखेरपर्यंत 335 कोटींचे उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे.
गेल्या वर्षभरात पालिकेला एकूण 445 कोटींचे उत्पन्न मिळाले. त्यापैकी एलबीटीतून मिळालेले उत्पन्न 335 कोटी इतके आहे. एस्कॉर्टच्या माध्यमातून वर्षभरात नऊ कोटी वसुली झाली. आतापर्यंत एलबीटीसाठी 25 हजार उद्योग, व्यावसायिकांची नोंद झाली. त्यापैकी साडेतेरा हजार व्यावसायिकच कर भरत आहेत. उर्वरित व्यावसायिक मार्च 2014 अखेरपर्यंत शोधण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. एलबीटीची नोंद न करणारे व नोंद असून, कर न भरणार्‍या व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आली आहे.