नाशिक - एलबीटी रद्दच्या निर्णयाबाबत सर्वच क्षेत्रात प्रचंड संभ्रम असल्याचा परिणाम शहरातील खरेदी-विक्रीच्या दस्त नाेंदणीवरही दिसून येत अाहे. राज्य सरकारने २४ जुलैला 'एलबीटी'बाबत अधिसूचना काढली असली, तरी अाॅगस्टपासून कशा प्रकारच्या तरतुदी असतील, कशावर एलबीटी माफ असेल, कशावर नाही याबाबत काहीच अादेश शासकीय कार्यालयांना अद्याप अालेले नाहीत. त्यामुळे संभ्रमाची स्थिती पाहायला मिळत अाहे.
नाेंदणी सहनिबंधकांकडेही २५ ते ३० जुलैपर्यंतच्या कालावधीत खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची दस्त नाेंद निम्म्याने घटली अाहे. सरकारकडून स्पष्टपणे अादेश येईपर्यंत व्यवहार काही काळाकरिता पुढे ढकलण्याला ग्राहकांनी पसंती दिल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले.
अाॅगस्टपासून एलबीटी रद्द हाेणार असल्याचे सरकारने जाहीर केले अाहे. त्याला अनुसरूनच २४ जुलै राेजी अधिसूचना प्रसिद्ध करून ५० काेटी रुपयांवरील वार्षिक उलाढाल असलेल्यांना एलबीटी भरावा लागेल, असे स्पष्ट करण्यात अाले अाहे. मात्र, प्रामुख्याने घरांच्या खरेदीची नाेंद करताना अाकारला जाणारा एलबीटी रद्द हाेणार का, याकडे घराचे स्वप्न पाहणाऱ्यांचे लक्ष लागून अाहे. अनेकांनी अापली िनयाेजित खरेदी व्यवहारांची दस्त नाेंद पुढे ढकलली अाहे. शहरातील उपनिबंधक कार्यालयाकडेही २० ते २४ जुलैदरम्यान नाेंदल्या गेलेल्या दस्तांच्या तुलनेत २५ ते ३० जुलैपर्यंतची नाेंद निम्म्यावर अाली अाहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा, नोंदणीची स्थिती..