आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिन्नरमधील खूनप्रकरणी कळंबचा नेता अटकेत, अनैतिक संबंधांतून खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सहा महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाच्या गुन्ह्याला मृतदेहाच्या अंगावरील शर्टच्या टेलर मार्कने वाचा फुटली. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी कळंबच्या (जि.उस्मानाबाद) राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यासह मृताच्या पत्नीला अटक केली. अनैतिक संबंधांत अडसर ठरत असल्याने त्यांनी खून केल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. एक संशयित फरार आहे.

सिन्नरमध्ये २४ फेब्रुवारीला दाताली शिवारातील शेततळ्यात डोके ठेचलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्याच्या शर्टवर ‘दीपक टेलर, कळंब ’ असे पुसट नाव होते. त्याआधारे पोलिसांनी कळंब तालुक्यातील दीपक टेलरचा पत्ता शोधून काढला. त्याच्या नोंदीवरून मृत हा बालाजी बनसोडे असल्याचे सिद्ध झाले. तो ६ महिन्यांपासून बेपत्ता होता. चौकशीत गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी तथा जिल्हा बँकेचा माजी संचालक भागचंद रामविलास भागरेचा याचे मृत बालाजीची पत्नी मंदाकिनी बनसोडे हिच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली.
 
अधिक चौकशीत भागरेचा याने बालाजीचा सिन्नर येथे खून केल्याची कबुली दिली. बालाजी मांत्रिक होता. सात-आठ महिन्यांपूर्वी गावातील एक मुलाचा मृत्यू झाला होता. बालाजीवर संशय असल्याने  त्यास मारहाण करत जीवे मारण्याची धमकी गावकऱ्यांनी दिली होती. बालाजीला वाचवण्यासाठी भागरेचा त्याला घेऊन सिन्नरला आला. येथेच मंदाकिनी व भागरेचाने त्याच काटा काढला.
बातम्या आणखी आहेत...