नाशिक- प्रादेशिक परिवहन कार्यालयात लर्निंग लायसन्स (शिकाऊ अनुज्ञप्ती) काढण्यासाठी आता तासन्तास रांगेत उभे राहावे लागणार नसून, कार्यालयात येण्यापूर्वी घरबसल्याच संकेतस्थळावर संपर्क साधून अधिकाऱ्यांचा वेळ घ्यावा लागणार आहे. महिनाभरापासून ही कार्यप्रणाली अंमलात येत असली, तरी येत्या शुक्रवार (दि. ५)पासून ऑनलाइन अपॉइंटमेंटशिवाय लर्निंग लायसनह्णच काढता येणार नसल्याचे परिवहन विभागाने जाहीर केले आहे.
या निर्णयामुळे तासन्तास लागणाऱ्या रांगा आणि ग्राहकांना वारंवार मारावे लागणारे हेलपाटे बंद होणार आहेत. अर्जदाराने ऑनलाइन अर्ज केल्यास त्यास कार्यालयाकडून मिळालेल्या वेळेस व संबंधित दिवशीच रांगेत उभे न राहता थेट प्रवेश मिळणार आहे. परिवहन अधिकारी जीवन बनसोड व जयंत पाटील यांनी माहिती दिली.
लर्निंग लायसन्ससाठी दररोज ७० ते ८० उमेदवार हजर असतात. कागदपत्रे तपासून, त्यांचे वाहतूक नियमांचे ज्ञान बघून त्यांना संगणकीय चाचणी घेण्यासाठी त्यांना पात्र-अपात्र ठरविले जाते. त्यानंतर ४० उमेदवारांची एक बॅच याप्रमाणे दोन वा तीन बॅचमध्ये संगणकीय परीक्षा घेतली जाते. नंतर पावती देऊन त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी ह्यलर्निंग लायसन्सह्ण घेण्यासाठी बोलावले जाते. सध्याच्या या प्रक्रियेत उमेदवारांचा वेळ, येण्या-जाण्याचा खर्च वाढत असल्याचे कार्यालयाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे ऑनलाइन अपॉइंटमेंटचा पर्याय निवडण्यात आला आहे. परिणामी या प्रक्रियेमध्ये गतिमानता येण्यास हातभार लागणार आहे.
पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर कार्यपद्धती
पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर घरबसल्या संकेतस्थळावर संपर्क साधून
आपल्याला हवा तो दिवस व वेळ टाकावी. अधिकारी उपस्थित असल्यास किंवा त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार अर्जदारास वेळ व दिनांक लगेचच मिळू शकेल. संबंधित अर्जदाराने त्याच दिवशी ठरलेल्या वेळेच्या आधी तासभर येऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. त्यानुसार त्याची पुढची प्रक्रिया पार पडेल. संबंधित परीक्षार्थी उत्तीर्ण झाल्यास लगेच ह्यलर्निंग लायसन्सह्णदेखील वितरित केले जाणार आहे.
प्रक्रिया अधिक गतिमान, सुलभ व पारदर्शक होईल ऑनलाइन अपॉइंटमेंट सक्तीने झाल्यामुळे अर्जदारांना एजंटकडे जाण्याचा प्रश्नच उरणार नाही. त्यांना घरबसल्या अथवा
मोबाइलवरदेखील संकेतस्थळावर संपर्क साधता येणार आहे. त्यामुळे ह्यलर्निंग लायसन्सह्णची प्रक्रिया सुलभ व पारदर्शक होणार आहे. ग्राहकांचा वेळ, पैसा वाचून कार्यालयातील कामकाजात अधिक सुसत्रूता येईल.- जीवन बनसोड, परिवहन अधिकारी