आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lease Not Affordable For Information Technology Park

अायटी पार्कसाठीचे भाडेदर न परवडणारे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अंबड अाैद्याेगिक वसाहतीत असलेल्या अायटी पार्क इमारतीचे एमअायडीसीने जाहीर केलेले भाडेदर परवडणारे असल्याने ते कमी करण्यात यावेत, अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट अॅण्ड एक्सपाेर्टर्स असाेसिएशनने एमअायडीसीकडे केली अाहे. सध्या राज्यात उद्याेगांत मंदीचे वातावरण असून, अनेक उद्याेगांचा व्यवसाय पन्नास टक्क्यांनी घटला अाहे. दुसरीकडे सातपूर अाणि अंबड अाैद्याेगिक वसाहतींमध्येच काही उद्याेगांकडे उत्कृष्ट बांधकामासह वीज पाणी जाेडणीसारख्या सुविधा उपलब्ध असून, त्यांचे दर अगदी ते १२ रुपये प्रति चाैरस फूट असतानाही एमअायडीसीचे दर मात्र अवाजवी असून, ते कमी करावेत, याकडे असाेसिएशनने एमअायडीसीच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले अाहे.

गेल्या बारा वर्षांपासून बांधकाम पूर्ण झालेल्या ग्राहकांच्या प्रतीक्षेत असलेल्या अंबड अाैद्याेगिक वसाहतीतील अायटी पार्क इमारतीकरिता भाडेदर कमी करावेत ही इमारत इतर उद्याेगांना खुली करता अायटी उद्याेगांनाच उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी हाेत अाली अाहे. खासदार हेमंत गाेडसे यांनीही याकरिता उद्याेगमंत्र्यांना साकडे घातले हाेते त्यानंतर एमअायडीसीने भाडेदराची जाहिरात प्रसिद्ध केली हाेती. या जाहिरातीनुसार या इमारतीत तळमजल्याकरिता २६ रुपये प्रति चाैरस फूट, तर पहिल्या मजल्याकरिता २४ रुपये प्रति चाैरस फूट, तर दुसऱ्या मजल्याकरिता २२ रुपये प्रति चाैरस फूट दर अाकारण्यात येणार अाहेत. एमअायडीसीच्या उपप्रादेशिक अधिकारी घाेडके यांच्याकडे असाेसिएशनचे चेअरमन रमेश पवार, एरेस साॅफ्टवेअर प्रा. लि.चे राहुल मल्हाेत्रा, गाेरख पगार, ज्युली सातभाई, धनंजय पवार अादींनी निवेदन देत दर कमी करण्याची इमारतीत सुविधा देण्याची मागणी केली.
वीज-पाण्याशिवाय गळक्या छताची इमारत
>अायटी पार्क इमारतीचे टेरेस वाॅटरप्रूफ नसल्याने ते संगणक, एअरकंडिशनर अाणि इलेक्ट्रिफिकेशन, फर्निचर यांना हानिकारक असून, पावसाळ्यापूर्वी इमारतीचे वाॅटरप्रूफ हाेणे अावश्यक अाहे.
>उद्याेजकांकडून जर या गाळ्यांत टाइल्स, वीज-नळजाेडणी, एअरकंडिशनर, इंटरनेट कनेक्शन, फर्निचर अादी सुविधा केली गेली तर गाळ्याच्या भाड्यात एमअायडीसीने ती वजावट द्यावी.
>काही गाळ्यांना टाइल्सच बसविलेल्या नाहीत, उद्याेजकांना गाळे देण्याअगाेदर एमअायडीसीने या टाइल्स बसविणे गरजेचे अाहे.
>विद्युतीकरण नाही. त्यामुळे फॅन, ट्यूब लाइट्स यांसह विद्युतीकरण एमअायडीसीने करणे गरजेचे अाहे.
>प्रत्येक गाळ्याला पाण्याच्या मीटरसह नळजाेडणी हवी.