आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘भारत माता की जय’ ही तर जीवनसाधना, बंडोपंत जोशी स्मृतिव्याख्यानात विवेक घळसासी यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भारत माता की जय ही केवळ एक घोषणा नसून आत्मभान जागृत करणारी, प्रेरणा देणारी जीवन साधना आहे. मानसिक पातळीवर सुंदर परिवर्तन करणाऱ्या भारत मातेच्या जयजयकारातून सदगुरुंबरोबरच मातृभूमीची ओढही दिसून येते, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी येथे केले.
राष्ट्रीय विचार प्रबोधिनीतर्फे गंगापूर रोड येथील प्रसाद मंगल कार्यालयात प्र. शं. (बंडोपंत) जोशी स्मृतिव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी घळसासी बोलत होते. या प्रसंगी आमदार राहुल आहेर, प्रकाश पाठक, लक्ष्मण सावजी, सुहास फरांदे, सतीश कुलकर्णी, विजय साने, निशिगंधा मोगल आदी मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत प्रत्येकामध्ये मातृभूमीविषयी चेतना जागविण्याचे बळ भारतमाता की जय मधून मिळाले. देश म्हणून अस्तित्व असल्याची जाणीव भारत मातेच्या जयजयकारातून होते. भारतमाता ही घोषणा मानणाऱ्यांना हिंदूत्वाचे आकलन झाल्याने त्यांना त्याचे महत्व कळाले नाही. भारत माता की जय ही एक ठिणगी असून त्यातून देशभक्तीचे जाज्वल्य जागृत होते. भारत माता की जय ही घोषण नसून तो एक महामंत्र असून तो सद््गुरुंप्रति तसेच मातृभूमीविषयीची ओढ निर्माण करून देत असल्याचेही घळसासी यांनी सांगितले. देवदत्त जोशी यांनी प्रास्ताविक केले. बंडोपंत जोशी यांनी सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांना घडविल्याचे त्यांनी सांगितले. स्वानंद बेदरकर यांनी सूत्रसंचालन केले.

पर्यावरणप्रेमी गायकवाड यांचा सन्मान
पर्यावरणपूरक विचार करून जगणे समृद्ध करण्याच्या उद्देशाने समृद्ध पर्यावरण करणाऱ्या पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड यांचा या वेळी विवेक घळसासी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आले. शाल, पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. गायकवाड यांनी पर्यावरणपूरक वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन या वेळी बोलताना केले.

पर्यावरण संतुलन राखणे खरे तर सर्वांची जबाबदारी
पर्यावरणाचे संतुलन राखणे ही सर्वांची जबाबदारी असून त्यासाठी प्रत्येकाने वृक्षांचे जतन करायला हवे. त्यासाठी केवळ शोभेच्या वृक्षांची लागवड करता पर्यावरण पूरक वृक्षलागवड करून पर्यावरणाचे संतुलन राखणे गरजेचे आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी संवेदनशील होणे आवश्यक आहे.
बातम्या आणखी आहेत...