आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलईडी प्रकरणी पालिका न्यायालयात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वादग्रस्त २०२ काेटी रुपयांचे एलईडी प्रकरण अायुक्तांच्या माैनामुळे रहस्य बनून राहिले असताना, महापालिकेने मात्र ८० काेटी रुपयांच्या बँक गॅरंटीचा ठेकेदाराकडून दुरुपयाेग हाेण्याची भीती व्यक्त करीत त्यास स्थगिती घेण्यासाठी चक्क जिल्हा न्यायालयात धाव घेतल्याची बातमी अखेर स्थायी समितीच्या सभेत फुटली. ठेकेदार जागा हाेऊन महापालिकेला शह देण्यासाठी प्रयत्न करेल, या भीतीतून या कारवाईची माहिती अायुक्तांपासून संबंधित अधिकाऱ्यांनी ‘सस्पेन्स’ ठेवली हाेती.
गेल्या वर्षभरापासून एलईडी प्रकरणाविषयीचे रहस्य कायम हाेते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापासून तर अनेक नेत्यांनी काही तरी साेक्षमाेक्ष लावा, परंतु शहरातील बंद पथदीपांची समस्या मार्गी लावा, असे अायुक्तांना सांगितले हाेते. दुसरीकडे ठेकेदाराने एलईडीचे साहित्य काही प्रमाणात पुरविले हाेते. मात्र, त्याचा दर्जा निविदेतील अटी-शर्तींप्रमाणे नसल्यामुळे विद्युत विभागाने ते स्वीकारण्यास नकार िदला हाेता. यापूर्वीच हे प्रकरण सर्वाेच्च न्यायालयापर्यंत जाऊन महापालिकेविराेधात निकाल लागल्याने नेमकी काय भूमिका घेतली जाते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले हाेते. विशेष म्हणजे, यासंदर्भात अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांना विचारले असता, त्यांनी कारवाईबाबतचा ‘पत्ता’ अाताच खाेलणार नसल्याचे सांगत याविषयी केवळ माझ्यापुरतीच माहिती मर्यादित असल्यामुळे अन्य काेणाला खबरबात नसल्याचाही दावा पत्रकारांशी बाेलताना केला हाेता.
दुसरीकडे शहरातील बंद पथदीपांमुळे नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले हाेते. मध्यंतरी एलईडी नसल्यामुळे पथदीपांसाठी काेट्यवधीचे साहित्य खरेदी करण्याची वेळ महापालिकेवर अाली हाेती. स्थायी समिती सभेत ७८ लाख ३३ हजार रुपयांच्या विद्युत खरेदीचा प्रस्ताव चर्चेवर अाल्यानंतर त्यास प्रा. कुणाल वाघ यांनी हरकत घेतली.
बाजू मानल्यानेे दिलासा
सर्वचनगरसेवक अाक्रमक झाल्यावर अधीक्षक अभियंता अार. के. पवार यांनी जिल्हा न्यायालयात एलईडी ठेकेदाराविराेधात जिल्हा न्यायालयात दावा दाखल केल्याचे सांगितले. ठेकेदाराकडून बँक गॅरंटीचा दुरुपयाेग होऊ शकताे, हे निदर्शनास अाणून दिल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे, न्यायालयाने महापालिकेची बाजू मान्य करीत बँक गॅरंटीच्या वापरास स्थगिती दिल्यामुळे महापालिकेला माेठा दिलासा मिळाला अाहे.