आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळीराजाला झाला पुन्हा पायावर उभा ठाकल्याचा आनंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मी शेतकरी आहे, शेतकरी जागेवर बसला तर काम कसं होणार? मागच्या वर्षी अपघातात पाय गेल्यानंतर आजच मी माझ्या दोन्ही पायांवर उभा असे सांगताना चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी सखाराम पाटील यांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वहात होता. निमित्त होते, मारवाडी युवा मंचतर्फे आयोजित कृत्रिम अवयव प्रत्यारोपण कॅम्पचे.

गंगापूररोडवरील सावरकरनगर भागातील राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये आयोजित या कॅम्पचा रविवारी समारोप झाला. 50 पेक्षा अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला. या विकलांग बांधवांना मंचतर्फे जयपूर फूट, कृत्रिम हाताचे वितरण करण्यात आले.

शिर्डीला पायी जाणार
अपंग जलतरणपटू म्हणून मी राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्येही पदके पटकावली आहेत. शिर्डीला दोनदा पायी गेलो आहे, आता पुन्हा या पायांनी जाण्याचा प्रयत्न करेन.
- सुनील पवार

सानिका उभी राहिली तरी समाधान
सानिका जन्मापासूनच दोन्ही पायांनी चालू शकत नाही. आता किमान तिच्या पायांवर एका जागी कशाचाही आधार न घेता ती उभी राहिली तरी समाधान वाटेल. सानिका सोनारच्या आईचे मनोगत.