आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उसाच्या फडात बिबट्याचा हल्ला; शेतकरी जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिंडाेरी - शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या गाेविंद सुभाष गणाेरे या शेतकऱ्यावर उसाच्या फडात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केल्याची घटना दिंडाेरी तालुक्यातील वागळूद येथे मंगळवारी सकाळी सातच्या दरम्यान घडली. या हल्ल्यात त्यांच्या डाेक्याला, मानेला छातीवर जखमा झाल्या आहेत. दिंडाेरीतील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत अाहेत. वनविभागातर्फे त्यांना तात्पुरती अार्थिक मदत म्हणून दाेन हजार रुपये देण्यात अाले अाहेत.
गणाेरे उसाला पाणी देत असताना लपलेल्या बिबट्याने पाठीमागून त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी प्रतिकार मदतीसाठी आरडाओरड केल्याने बिबट्याने पळ काढला. मात्र, ताे त्याच उसाच्या शेतात लपलेला हाेता. ही माहिती कळताच वनविभागाचे कर्मचारी विक्रम अहिरे यांच्या नेतृत्वाखाली दुसाने, दळवी, ढाकणे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या ठिकाणी पिंजरा लावला.

भक्ष्य,पाण्याच्या शाेधात वन्यप्राणी वसाहतींकडे : वागळूदगाव अाेझरखेड धरणास लागून अाहे. उन्हाळ्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य अाहे. त्यामुळे भक्ष्य, पाण्याच्या शाेधात वन्यप्राणी वसाहतीकडे येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे अावाहन वनविभागातर्फे करण्यात अाले अाहे.