आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिरीत पडल्याने बछड्याचा मृत्यू. मुखेड शिवारातील आहेर वस्तीवरील घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला - बिबट्याच्या मादी जातीच्या बछड्याचा मुखेड शिवारातील आहेर वस्तीवरील विहिरीत पडून अंत झाला. वनविभागाला या घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर पंचनामा करण्यात आला. त्यानंतर बछड्याचे दफन करण्यात आले.
शनिवारी पहाटेच्या सुमारास अरुण संपत आहेर यांच्या शेतातील विहिरीत सुमारे तीन महिने वयाच्या मादी जातीच्या बिबट्याचा बछडा पाण्यात पडला. सकाळी नऊ वाजता आहेर यांच्या शेतमजुराने मृत बछड्यास पाहिले. यानंतर मालकास त्याने माहिती दिली. प्रथमदर्शनी मांजरासारखे भासणारे, परंतु विहिरीबाहेर काढल्यानंतर बछडा असल्याचे बघताच परिसरातील शेतक-यांना हदराच बसला. अरुण आहेर यांनी तत्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी पंडितराव जाधव यांना याविषयी कळवले. यानंतर जाधव, वनपरिमंडल अधिकारी अशोक काळे, वनरक्षक वाय. के. खिरकांडे यांनी घटनास्थळी भेट देत मृत बछड्याचा पंचनामा केला. शहरातील पशुवैद्यकीय रुग्णालयात बछड्याचे शवविच्छेदन करण्यात आले.