आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद!

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निफाड । सुंदरपूर (ता. निफाड) येथे ब-याच दिवसांपासून धुमाकूळ घालणा-या बिबट्याच्या मादीला वनविभागाने शुक्रवारी सकाळी अखेर पिंज-यात जेरबंद केले. आत्तापर्यंत या शिवारात तीन बिबट्यांना जेरबंद करण्यात आले आहे.
परिसरातील शेळ्या, कुत्रे आणि कोल्ह्यांची बिबट्याने शिकार केल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत होती. बिबट्याच्या दहशतीमुळे पिकांना रात्रीच्या वेळी पाणी देणे कठीण झाले होते. काही शेतकरी एकमेकाची सोबत करून पाणी देण्याचे काम करत होते. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर वनविभागाने गावात पिंजरा ठेवला होता. प्रभाकर सोमवंशी यांच्या विहिरीजवळ गेल्या आठवड्यात बिबट्याने अनेक वेळा दर्शन दिले होते. त्यामुळे हा पिंजरा या विहिरीजवळ ठेवण्यात आला होता.