नाशिक - येथील अंबड अाैद्याेगिक वसाहतीत क्राॅम्प्टन ग्रीव्हज कंपनीत शुक्रवारी बिबट्याचा बछडा घुसला. कंपनीत बिबट्या घुसल्याची माहिती कामगारांनी सुरक्षा रक्षकांना दिली, प्रशासनाने ही माहिती अंबड पाेलिस ठाण्यासह वन विभागाला कळविली, अाठ महिने वयाच्या बछड्याला दीड तासात जेरबंद करण्यात वन विभागाला यश अाले.
क्राॅम्प्टन ग्रीव्हज कंपनीतील गोदामसदृश्य जीअायएस शेडमध्ये हा बिबट्या घुसला होता. हे समजल्यानंतर उपवनसंरक्षक अनिता पाटील व वनविभागाचे कर्मचारी, हे सात ते अाठ महिने वयाचे पिल हाेते व त्याचे वजन ३५ ते ४० किलाेच्या आसपास होते.