आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साकूरला वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इगतपुरी- तालुक्यातील साकूर शिवारात वाहनाने बिबट्याला धडक दिल्याने बिबट्याला प्राण गमवावे लागले. शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास नवीन राष्ट्रीय क्रमांक ३७ या महामार्गावर पाच ते सहा वर्षे वयाचा मृत बिबट्या आढळून आला. जंगलतोड आदी कारणांमुळे वन्यजीव मानववस्तीत आपले भक्ष्य शोधण्यासाठी येतात. साकूर परिसरात उसाचे क्षेत्र जास्त असल्याने बिबट्याचा वावर परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. वारंवार पिंजरे लावण्याची मागणी करूनही वनविभागाचे अधिकारी याकडे डोळेझाक करीत आहेत. काही दिवसांपूर्वी पाडळी देशमुख, वाडीवऱ्हे महामार्गावर बिबट्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. ही बाब अतिशय गंभीर असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. या घटनेची माहिती येथील शेतकरी शिवाजी सहाणे यांनी सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देताच वनपरिक्षेत्र अधिकारी संजय अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मृत बिबट्यास उत्तरीय तपासणीसाठी नाशिकला पाठविण्यात आले आहे.