आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS :निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या घरात घुसला बिबट्या, नागरिकांची पाचावर धारण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उपनगर चाैकाजवळील अश्विनी हाउसिंग साेसायटीतील निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यात गुरुवारी घुसलेल्या बिबट्याचा बछड्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या पथकाला यश अाले. लाेकवस्तीत घुसलेल्या बिबट्यामुळे नागरिकांची पाचावर धारण बसली हाेती.
अश्विनी साेसायटीतील माेहिनी फडकर दूध घेण्यासाठी बाहेर अाल्या असता २४ नंबरच्या बंगल्याच्या अावारात बिबट्या फिरताना दिसला. त्यांनी आरडाओरड करून सर्वांना दारे, खिडक्या बंद करण्यास सांगितले. या भागातील मारुती काकडे यांनी बंगल्याच्या गच्चीवर जाऊन बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. गर्दी वाढल्याने बिबट्याने तीन डरकाळ्या फाेडल्या, तेव्हा सर्वांनाच घाम फुटला. पाेलिसही घटनास्थळी दाखल झाले.

फडकर यांनी दगड मारून बछड्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला; पण बछड्याने जागा व दिशा बदलल्याने त्या घाबरून गाडीत जाऊन बसल्या. बछडा जेरबंद होईपर्यंत ३ तास त्या कारच्या बाहेर पडल्याच नाहीत. दरम्यान, वन विभागाचे अधिकारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. वनरक्षक एस.पी. थाेरात यांनी या बिबट्यावर इंजेक्शन साेडले, त्यामुळे ताे बेशुद्ध झाला. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने तातडीने बिबट्याला पिंजऱ्यात डांबले. या पथकाने अवघ्या पंधरा मिनिटांत माेहीम फत्ते केली.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, वाहनाच्‍या धडकेत बिबट्या ठार..