आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्या बंगल्यात, महिला तीन तास कारमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - उपनगर चाैकानजीक एका बंगल्याच्या अावारात गुरुवारी सकाळी घुसलेला अंदाजे दाेन वर्षे वयाचा बिबट्याचा बछडा वनविभागाने बेशुद्ध करून जेरबंद केला. या बछड्यामुळे रहिवासी भयभीत झाले हाेते. काही वर्षांपूर्वी माेटवाणी राेडवरील टीव्ही बिल्डिंग येथील घरात बिबट्या घुसला हाेता, याची या घटनेने अनेकांना अाठवण झाली.

जयभवानी राेडवरील अाश्विनी हाैसिंग साेसायटीतील निवृत्त लष्करी अधिकारी पी. आर. फडकर यांच्या बंगल्याच्या अावारात हा बछडा घुसला हाेता. माेहिनी फडकर या दूध अाणण्यासाठी घराबाहेर पडल्या असता, त्यांना हा बछडा दिसताच त्यांनी घराचा दरवाजा बंद करण्यास सांगितले. तेथेच राहणारे मारुती काकडे यांनी बंगल्याच्या गच्चीवरून टाळ्या वाजवून बछड्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. बंगल्याच्या बाजूच्या माेरीत घुसलेला बछडा शेवटपर्यंत तेथेच बसून हाेता. त्याने तीन डरकाळ्या फाेडल्या. बघ्यांच्या गर्दीमुळे जयभवानीराेड दाेन्ही बाजूने पाेलिसांनी वाहतुकीस बंद केला.
बिबट्या कसा पकडला वाचा पुढील स्लाईडवर...