आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही शाळेत जायचे कसे..., शिंगवे येथील दीपाली कोठे हिच्या बळीनंतर मुलींचा सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी - कुत्रेभुंकले.. शेळी ओरडली.. गाय किंवा बैल हांबरले तरी मनात धस्स होते.. अंगावर काटा उभा राहतो.. आता काय होईल, म्हणून झोप लागत नाही.. सकाळी घाबरत घाबरत सर्वत्र लक्ष ठेवून अंगण झाडावे लागते... त्यात वाऱ्याने उसाची पाने सळसळली तरी घरामध्ये पळ काढावा लागतो.. अशी स्थिती महिला-पुरुषांची आहे. लहानग्यांची परिस्थिती तर भयाण आहे. बिबट्याच्या दहशतीत आम्ही शाळेत कसे जायचे, असा प्रश्न शिंगवे, करंजगाव, चापडगाव भागातील मुले विचारत आहेत.
शनिवारी करंजगाव येथील सहा वर्षांचा विकी पिठे तर मंगळवारी लगेचच शिंगवे येथील माणिक मोगल यांच्या उसाच्या फडात बिबट्याने साडेपाच वर्षीय दीपाली कोठे हिचा बिबट्याने बळी घेतला. त्यामुळे या पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून, नागरिकांचे जनजीवनच विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांना गटागटानेच काम करावे लागत आहे, तर महिला घराच्या बाहेर निघण्याची हिंमत करीत नसल्याचे चित्र आहे. दीपालीला तिच्या आजी आणि आजोबांसमोर बिबट्याने मानेला धरीत उसात ओढत नेले. या वेळी आजीने वाचविण्याचा प्रयत्न केला. आवाज ऐकून रघुनाथ जाधव घटनास्थळी आले. रक्ताच्या मागाने ते उसात शिरले. दीपाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. स्थिती गंभीर असल्याने तिला शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला स्थानिक डॉटरांनी दिला. परंतु, दीपालीचा रस्त्यातच मृत्यू झाला. तिच्या आई-वडिलांनी रात्री दोन वाजताच दात्याने येथे तिचा अंत्यविधी केला. दरम्यान, या घटनेनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जागे व्हावे लागणार आहे. बिबट्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली असून सिन्नर, येवला, राजूर, अकोले, इगतपुरी या परिक्षेत्रामध्येच सुमारे दोनशेहून अधिक बिबटे असल्याची माहिती वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव छापण्याच्या अटीवर दिली.

रेस्क्यूव्हॅन दिखाव्याला
वनविभागानेबिबट्याच्या बंदोबस्तासाठी खास रेस्क्यू व्हॅन उपलब्ध करून दिलेली आहे. तिचा कोणताही वापर होत नसल्याने ती पडून आहे. जर ही व्हॅन आठवड्यातून दोनदा बिबट्यांचा अधिवास असलेल्या भागात फिरल्यास नागरिकांना दिलासा मिळेल. परंतु तसे होत नाही.

बिबट्या नरभक्षक?
पंधरा दिवसांत कुत्र्यांचा फडशा तसेच दोन दिवसांच्या अंतराने दोन बालकांचा बिबट्याने बळी घेतला. हा बिबट्या नरभक्षक झाला की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी यास नकार दिला, याचा तपास केल्यानंतरच ते समजेल, असे सांगितले.

आठलाख रुपये भरपाई
पूर्वीवन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसाला दोन लाख रुपये दिले जात होते. आता यामध्ये शासनाने वाढ करून आठ लाख रुपये केले आहे.

आॅन दि स्पाॅट रिपोर्ट

शाळेत जायला वाटते मुलींना भीती
घराच्याबाहेर पडायलाच भीती वाटत असल्याने आता शाळेत जायलाही भीती वाटत आहे. भीती वाटत असल्याने शाळेत गेले नाही, आता आमच्या शिक्षणाचे काय होईल. -शुभांगी प्रकाश खालकर, वदि्यार्थिनी (इयत्ता सहावी)

बिबट्याचा बंदोबस्त करा, अन्यथा ग्रामस्थांचा मोर्चा
^वनविभागानेया भागात त्वरित कर्मचाऱ्यांची गस्त वाढविली नाही आणि पिंजऱ्यांची कायमस्वरूपी सोय केली नाही तर वनविभागाच्या कार्यालयावर परिसरातील सर्व गावांतील नागरिक मोर्चा काढतील. -भास्कर डेर्ले, सरपंच, शिंगवे

पिंजरे ठेवून गस्तीवर भर देणार
शिंगवेभागात पिंजरे ठेवण्यात आले आहेत. तसेच या भागात वनरक्षकांची गस्त वाढविण्यात येणार आहे. -भगवान ढाकरे, वनक्षेत्रपाल, येवला

प्रयत्न निष्फळ ठरले
मुलीला जेव्हा बिबट्याने उसात नेले, त्यावेळी कोणीही नव्हते. आवाज आल्याने मी पळत आलो. मुलींच्या आजीने सांगितले, उसात नेले. तेव्हा रक्ताच्या मागावर जाऊन शोध घेतला तर ५० ते ६० फूट आत ओढत नेले. मुलीला सोडून बिबट्या लपून बसला होता. मुलगी जिवंत असल्याने तिला उचलून तिला बाहेर आणले. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. रघुनाथयशवंत जाधव, प्रत्यक्षदर्शी