आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवळाली परिसरात बिबट्याचा वावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवळाली कॅम्प - देवळाली कॅम्प परिसरातील विजय नगर भागातील कदम मळ्यात बिबट्याने अर्धवट खालले वासरू आढळल्याने बिबट्याच्या पावलाचे ठसे उमटल्याचे अाढळल्याने परिसरातील नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात वन विभागाने त्वरित पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
विजयनगर येथे दारणा नदीलगत कदम-शेळके-करंजकर आदी मळे परिसर असून, येथे अनेक वेळा वन्य प्राणी निदर्शनास पडतात. रविवारी (दि. १८) सकाळी अंबादास कदम हे नियमितपणे चिक्कूच्या बागेत गेले असता तिथे त्यांना अर्धवट खाल्लेले वासरू आढळून आले. त्याच ठिकाणी मातीवर बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. दुपारी वनविभागाचे राऊंड अधिकारी रवी साेनार पाटील यांनी घटनास्थळावर पंचनामा केला. दरम्यान, बिबट्याचा या परिसरात वावर असल्याचे कळाल्याने परिसरात भीतीचे वातावरण अाहे.

या परिसरात वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी संदीप कदम, अंबादास कदम, उत्तम आहेर, सोमनाथ करंजकर, नीलेश कासार, प्रवीण शेळके, रामकिसन करंजकर आदी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत काहीरनार यांनी दाेन दिवसांत पिंजरा लावण्याचे अाश्वासन दिले.
बातम्या आणखी आहेत...