आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेरीत ‘जलगती’च्या भिंतीवर बिबट्याचा आराम; वनविभागाचा मात्र विश्राम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरी परिसरात जलगती केंद्राच्या भिंतीवर बसलेला बिबट्या. - Divya Marathi
मेरी परिसरात जलगती केंद्राच्या भिंतीवर बसलेला बिबट्या.
नाशिक- मेरी परिसरात बिबट्याच्या मुक्त संचार सुरूच आहे. शनिवारी (दि. ९) जलगती केंद्र कार्यालयाच्या परिसरातील भिंतीवर बसलेल्या बिबट्याचे दर्शन घडले. यामुळे या परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले अाहे. या परिसरात बिबट्याचा मुक्त फिरत असतानाही वनविभागाकडून ठोस उपाययोजना हाेत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त हाेत अाहे. 

शहरातील मेरी परिसरात काही दिवसांपूर्वी काही नागरिकांना बिबट्या दिसला होता. त्यानंतर मखमलाबाद राेड, माेरे मळा, गंधारवाडी, हिरावाडी या परिसरातही बिबट्याने दर्शन दिले हाेते. त्या-त्या वेळी वनविभागाने या परिसरात पिंजरा लावण्याचा देखावाही केला हाेता. मात्र त्याचा काहीहीउपयाेग झाला अनसल्याने शनिवारी दिसलेल्या बिबट्याच्या घटनेने सिद्ध हाेत अाहे. शनिवारी ज्या भागात बिबट्या दिसला त्या भागातही खरेतर वनविभागाने पिंजरा लावला हाेता. पण, कालांतराने तेथील पिंजरा काढून घेण्यात अाला. अाता शनिवारी दुपारनंतर मेरी येथील जलगती केंद्राच्या भिंतीवर बिबट्या बसला असल्याचे येथील कर्मचाऱ्यांना दिसले. या कर्मचाऱ्यांनीच ही माहिती तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविली. अंधार दाट झाडी असलेला हा परिसर असल्याने बिबट्याने धूम ठाेकली अाणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना परत फिरावे लागले. रविवारी सकाळी पुन्हा या परिसरात शोध मोहीम राबविण्यात येणार असून या परिसरात पिंजरा लावण्यात येणार असल्याने वनविभागाचे रवींद्र साेनार यांनी सांगितले. 

ताे पिंजरा ठेवला असता तर... 
१५दिवसांपूर्वी जलविज्ञान केंद्र परिसरात काही नागरिकांना बिबटया दिसला हाेता. त्यानंतर वनविभागाने त्या ठिकाणी पिंजरा लावला हाेता. एका ठिकाणी बिबट्या राहत नाही असे स्पष्टीकरण देत या भागातील पिंजरा काढण्यता अाला हाेता. मात्र अाता पुन्हा याच परिसरात बिबट्या दिसल्याने ताे पिंजरा ठेवला असता तर कदाचित बिबट्या त्यात सापडला असता अशी चर्चा सुरू अाहे. 
बातम्या आणखी आहेत...