आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Leopard In The City Issue At Nashik, Divya Marathi

शूss फिरू नका, बिबट्या येईल..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- नाशिकरोडच्या रोकडोबावाडीतील डोबी मळ्यात नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली आहेत. शनिवारी एक बिबट्या पिंजर्‍यता अडकला असला तरी अजूनही तीन बिबटे असल्याची भीती व्यक्त होत आहे. तर, वडनेरदुमाला परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

नाशिकरोड परिसरात लष्करी परिसर असल्याने वालदेवी नदीकिनारी दाट झाडी असल्याने सातत्याने बिबट्या येत असतो. एक आठवड्यापासून या भागात बिबट्या असल्याची भीती आहे. त्यामुळे वनविभागाच्या अधिकार्‍यांनी बिबट्याला पकडावे, अशी मागणी होत आहे.

दोन पिंजरे लावा
एकूण चार बिबटे असून, एकाला पकडले आहे; मात्र नागरिकांमध्ये भीती कायम आहे. त्यामुळे येथे एक नाही तर दोन पिंजरे लावून बिबट्याला पकडण्यात यावे. बाजीराव मते, नागरिक

सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान कॅम्परोडवरील पोरजे फार्महाऊसच्या समोर उसाला पाणी भरीत असताना मध्यम आकाराचा बिबट्या दिसला. तसेच, बिबट्याच्या पायाचे ठसेही आहेत, त्यामुळे परिसरात भीतीची छाया आहे. रवींद्र पोरजे, शेतकरी वडनेरदुमाला

शनिवारी एक बिबट्या पकडण्यात आला असून, पुन्हा पिंजरा लावण्यात येणार आहे. एम. एस. गोसावी, वनपरिक्षेत्र अधिकारी