आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विष प्रयोग करून बिबट्याची हत्या; आरोपीला पोलिस कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव - तालुक्यातील गरबड शिवारात गावदरा डोंगरावर तीन वर्ष वयाच्या नर बिबट्याची विषप्रयोग करून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याला ठार केल्याने संतापलेल्या गोपाळा निंबा गोंदे याने हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी वन विभागाने गोंदे याला अटक केली असून त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गरबड शिवारात मोठ्या प्रमाणावर आदिवासींचे वास्तव्य आहे. सध्या जंगलात अन्न व पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने वन्य प्राणी नागरी वस्त्यांमध्ये शिरकाव करत आहे. २९ फेब्रुवारी रोजी गोंदे हा डोंगरावर जनावरे चारत असताना बिबट्याने वासरावर हल्ला केला होता. यात वासराचा मृत्यू झाला होता. या प्रकारामुळे संतापलेल्या गोंदे याने मृत वासराच्या शरीरावर विष टाकले होते. बिबट्याने विष टाकलेले मृत वासरू खाल्ल्याने त्याचा १ मार्च रोजी मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी हा प्रकार गाेंदे याच्या लक्षात अाल्याने त्याने भीतीपाेटी मित्राच्या मदतीने बिबट्याला डाेंगरावर पुरूले. खबऱ्याकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर गोंदे याल अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...