आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेच्या धडकेने बिबट्या ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- वंजारवाडी ते लहवितदरम्यान रेल्वेच्या धडकेने बिबट्या ठार झाल्याची घटना घडली. तीन दिवसांपूर्वी मध्यरात्री बिबट्या ठार झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शुक्रवारी सायंकाळी गँगमन जनार्दन लोरे व राजेंद्र दिवटे यांना पोल क्रमांक 170/30, 32 येथे अप लाइनच्या बाजूला मृतावस्थेतील बिबट्या आढळला. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेश आखाडे यांनी वन विभागास माहिती दिली. मृत बिबट्या नर असून, त्याचे वय साधारण साडेतीन वर्षे आहे.