आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मखमलाबादला मळ‌े परिसरात बिबट्याचे दर्शन, वन विभागाकडून दुजोरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मखलमलाबाद परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा दुजोरा वनविभागाने दिला. दोन दिवसांपुर्वी परिसरातील सुळे फार्म येथे बिबट्याचा वावर असल्याचे आढळले. परिसरात बिबट्याच्या पाऊलखुणाही आढळून आल्या. बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दक्षता म्हणून वन विभागाकडून दोन ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहे. 

 

मखलाबाद परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. शनिवारी परिसरातील सुळे फार्म परिसरात बिबट्याचे मळे परिसरातील नागरिकांना दर्शन झाले. हाकेच्या अंतरावर बिबट्या दिसल्याने प्रत्यक्षदर्शी प्रचंड घाबरले काही नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने मुंगसरा परिसराकडे धूम ठोकली. रविवारी सकाळी वनविभागाचे वनपाल जी. एस. वाघ यांनी घटनास्थळी पाहणी केली. सुळे फार्म आणि साठे मळा परिसरात बिबट्याच्या पाऊल खुणा आढळून आल्या. खबरदारीचा उपाय म्हणून म्हैसधुने मळा, सुळे फार्म येथे दोन पिंजरे लावण्यात आले आहे. 

 

नागरिकांनी सतर्कता बाळगावी : परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी सतर्क रहावे. पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी बांंधावीत, रात्रीच्या वेळी प्रखर लाईट लावावा, दिवसा काम करतांना सतर्कता बाळगावी, रस्त्याने एकटे जाऊ नये आदी सूचना वन विभागाकडून नागरिकांना करण्यात येत आहे. 

बातम्या आणखी आहेत...